‘प्रजासत्ताक दिनी श्रमदान करणार!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:47 IST2021-01-13T04:47:24+5:302021-01-13T04:47:24+5:30
एरंडाच्या भावी सदस्यांचा सत्कार निहिदा : बार्शिटाकळी तालुक्यातील एरंडा येथे अविरोध निवड निश्चित झालेल्या भावी ग्रामपंचायत सदस्यांचा तालुका गुरुदेव ...

‘प्रजासत्ताक दिनी श्रमदान करणार!’
एरंडाच्या भावी सदस्यांचा सत्कार
निहिदा : बार्शिटाकळी तालुक्यातील एरंडा येथे अविरोध निवड निश्चित झालेल्या भावी ग्रामपंचायत सदस्यांचा तालुका गुरुदेव सेवा मंडळातर्फे ग्रामगीता व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रचार प्रमुख डॉ. अशोक रत्नपारखी होते. या वेळी देवीदास कावरे, राष्ट्रीय कीर्तनकार श्रीकृष्ण सावळे गुरुजी, आर. आय. शेख गुरुजी, भीमराव गावंडे, हरिदासजी रत्नपारखी, संजय महाराज काकड, मधुकरराव सरप यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला तालुका युवक प्रमुख प्रा. योगेश सरप, सरचिटणीस राजेश शिंदे, शंकरराव अढाऊ, पाचघने गुरुजी, तसेच भावी ग्रामपंचायत सदस्य पवन शर्मा, अश्विनी शंकर ढवळे, साहेबराव बनसोड, अलका सुनील भोंगरे, मोहिनी गणेश वैराळे, रिता गौतम निकोसे, सीमा बंडू बघे, शीला विलास फाटकर, सुरेश शिंदे आदी उपस्थित होते. (फोटो)