दुकानदार, गर्भवती महिलांचे घेणार ‘थ्रोट स्वॅब’ नमुने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:55 AM2020-07-28T10:55:37+5:302020-07-28T10:55:49+5:30

दुकानदार, गर्भवती महिला व ६० वर्षावरील दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.

Will take 'throat swab' samples of pregnant women, shopkeepers | दुकानदार, गर्भवती महिलांचे घेणार ‘थ्रोट स्वॅब’ नमुने!

दुकानदार, गर्भवती महिलांचे घेणार ‘थ्रोट स्वॅब’ नमुने!

Next

अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, अकोला तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावांमध्ये दुकानदार, गर्भवती महिला व ६० वर्षावरील दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, दहीहंडा, उगवा, कुरणखेड, कानशिवणी, चांदूर, बाभुळगाव, पळसो, आगर, भौरद, घुसर, पातूर नंदापूर, चिखलगाव व आपातापा इत्यादी मोठ्या लोकसंख्येच्या गावात तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये गावातील सर्व दुकानदार, गर्भवती महिला आणि ६० वर्षावरील दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींच्या घशातील स्रावाचे (थ्रोट स्वॅब) नमुने घेण्यात येणार आहेत, अशी माहिती अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी दिली.

Web Title: Will take 'throat swab' samples of pregnant women, shopkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.