या वर्षी तुरीचे शासकीय खरेदी केंद्र सुरू होतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 08:51 PM2018-12-15T20:51:26+5:302018-12-15T20:52:56+5:30

-राजरत्न सिरसाट अकोला : तूर उत्पादन आता काढणीला येणार आहे. बाजारात सध्या तुरीचे प्रतिक्ंिवटल दर ४,४०० रुपये आहेत. हमीदरापेक्षा ...

Will start a government procurment cente | या वर्षी तुरीचे शासकीय खरेदी केंद्र सुरू होतील का?

या वर्षी तुरीचे शासकीय खरेदी केंद्र सुरू होतील का?

Next
-र
ाजरत्न सिरसाटअकोला : तूर उत्पादन आता काढणीला येणार आहे. बाजारात सध्या तुरीचे प्रतिक्ंिवटल दर ४,४०० रुपये आहेत. हमीदरापेक्षा हे दर कमी आहेत. म्हणूनच यावर्षी तरी हंगामापूर्वी शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू होतील का, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. एकूणच मागचा अनुभव बघता, सध्यातरी खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली दिसत नाहीत. २०१३-१४ मध्ये तुरीचे दर गगनाला भिडले होते. म्हणून कृषी विभागाने त्यानंतर कडधान्य, तूर लागवडीवर भर दिला. चार वर्षांपूर्वी १२० ते १६० रुपये किलोग्रामपर्यंत तुरीच्या डाळीचे दर पोहोचले होते.तुरीचे दरही वधारले होते. कृषी विभागाने तुरीच्या लागवडीसंदर्भात शेतकºयांच्या केलेल्या प्रबोधनानंतर २०१६-१७ मध्ये तुरीचे बंपर उत्पादन झाले; पण शासकीय खरेदी कें द्र सुरू करण्यात शासनाने उशीर केला. खरेदी सुरू केली तर त्यामध्ये आॅनलाइनची अट असल्याने शेतकºयांना यासाठीची प्रचंड कसरत करावी लागली. एकरी उत्पादनाचे निकषही त्यामध्ये होतेच. अशा सर्व कठीण परिस्थितीचा सामना करताना जेरीस आलेल्या हजारो शेतकºयांची तूर खरेदी झाली नाही. अशावेळी शेकडो शेतकºयांनी गरजेपोटी व्यापाºयांना तूर विकावी लागली. यावर्षी तुरीचे पीक चांगले आहे. सध्या हे पीक परिपक्वतेच्या अवस्थेत आहे. त्यामुळे शेतकºयांना आतापासूनच तूर विक्रीची चिंता लागली आहे; पण शासकीय स्तरावर अद्याप कोणतेच नियोजन नसल्याचे चित्र आहे. पीक हातात येण्याअगोदरच खरे तर असे खरेदी करण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे; परंतु शेतमाल बाजारात आणेपर्यंत कोणत्याच हालचाली होत नाही. प्रथम शेतकºयांचे पोट भरू द्या, नंतर शेतकºयांकडे बघू, असे शेतकºयांना वाटत आहे. अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागणाºया शेतकºयांना शेतमाल विकावाच लागतो. त्यामुळे शेतकरी शेतातून माल काढला की थेट बाजारात आणतो. ज्या शेतकºयांकडे माल साठवून ठेवण्याची व्यवस्था व इतर आर्थिक स्रोत असेल, ते शेतकरी साठवून ठेवतात; पण अल्पभूधारक शेतकºयांना तर पर्यायच नसतो. या शेतकºयांच्या व्यथांकडे शासनाने बघणे गरजेचे आहे; पण तसे होतच नसल्याचे दरवर्षीचे चित्र आहे.दरम्यान, सोयाबीन खरेदी केंद्राच्या बाबतीत यावर्षी असाच गोंधळ घालण्यात आला. शेतकºयांनी ५० टक्क्यांवर सोयाबीन विक्री करेपर्यंत खरेदी केंद्र सुरू केले नाहीत. केले त्याचे प्रमाण त्रोटक होते. दरम्यान, सोयाबीनच्या दरात चालू आठवड्यात दीडशे ते दोनशे रुपयांनी घट झाली असून, हे दर प्रतिक्ंिवटल ३,१०० ते ३,२०० रुपयांपर्यंत खाली आले. यावर्षी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात विलंब झाला असून, अद्याप पूरक खरेदी केंद्रं सुरू झाली नाहीत; पण मागील महिन्यात बााजारातील दर प्रतिक्ंिवटल ३,३५० रुपयांपर्यंत वाढले होते, त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला होता. शासनाने सोयाबीनचे आधारभूत दर ३,३९९ रुपये प्रतिक्ंिवटल जाहीर केलेले आहेत. बाजारात प्रतिक्ंिवटल सरासरी ३,३५० रुपये शेतकºयांना मिळत होते, तोपर्यंत चिंता नव्हती. आता दरात घट सुरू झाली असून, दर वाढतील, या प्रतीक्षेत बाजारातील सोयाबीनची आवकही घटली आहे. शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १,८५७ क्ंिवटल सोयाबीन विक्रीस आले होते. या आठवड्यात ही सरासरी आवक आहे. मागच्या महिन्यात हीच आवक सरासरी चार हजार क्ंिवटल एवढी होती. हे दर स्थिर राहतील, अशी शक्यता व्यापारी वर्तुळात आहे.

Web Title: Will start a government procurment cente

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.