शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी शरद पवारांचे आव्हान स्विकारणार का ? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 14:26 IST

राष्ट्रीय पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी परस्परांना आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगत, पंतप्रधान मोदी हे शरद पवारांचे आव्हान खरोखरच स्विकारतील का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केला.

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गोंदिया येथील प्रचार सभेत तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या दोघांनी तोंड उघडले तर अनेकांचे खरे चेहरे समोर येतील असा गर्भित इशारा कोणाचेही नाव न घेता दिला होता. त्यानंतर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथील प्रचार सभेत, आमची कळ काढाल तर माफी नाही, असे प्रत्त्युत्तर दिले होते. राष्ट्रीय पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी परस्परांना आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगत, पंतप्रधान मोदी हे शरद पवारांचे आव्हान खरोखरच स्विकारतील का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केला. निवडणूक काळात सगळ्यांच्या गोष्टींचा खुलासा झाला पाहिजे, सर्वच गोष्टी समोर आल्या पाहिजे, म्हणून पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचे आव्हान स्विकारणे गरजेचे आहे, आहे अशी पुष्टीही यावेळी त्यांनी जोडली.शुक्रवारी अकोला येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सद्या तिहार तुरुंगात कुख्यात डॉन छोटा राजन व अगुस्ता वेस्टलँड हेलीकॉप्टर सौद्यातील आरोपी बंदिस्त आहेत. या दोघांनी तोंड उघडले तर अनेकांचे खरे चेहर समोर येतील, असा इशारा नरेंद्र मोदी यांनी गोंदिया येथील सभेत दिला. भारतातून फरार असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याने शरणागतीचा प्रस्ताव भारत सरकारला दिला होता. त्यावेळी संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते. परंतु, हा प्रस्ताव शरद पवार यांनी फेटाळला होता, याचा संदर्भ देताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, की ही बाब दाऊदचा एकेकाळचा हस्तक असलेला व सद्या तिहार तुरुंगात कैद असलेला छोटा राजनच्या तोंडून बाहेर पडेल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. तसेच अगुस्ता वेस्टलँड प्रकरणातील आरोपीही तीहार मध्ये कैद असून, त्यानेही तोंड उघडले, तर काय होईल, याचाही धसका राकाँ नेत्यांनी घेतला आहे. म्हणूनच उस्मानाबाद येथील प्रचार सभेत शरद पवारांनी मोदींना प्रत्त्यूतर देताना, आमची कळ काढाल तर माफी नाही, असा अप्रत्यक्ष इशाराच मोदींना दिला होता. असे हे ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरु असताना, सर्व सत्य समोर येणे गरजेचे आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचे आव्हान स्विकारून तिहारमधील बाबीचा खुलासा करावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदी