पत्नीची पतीला मारहाण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2017 01:25 IST2017-06-15T01:25:21+5:302017-06-15T01:25:21+5:30

अकोला : पतीने पत्नीचा छळ करणे तसेच मारहाण करण्याचे अनेक प्रकार घडत आहेत; मात्र सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पत्नीने थेट पतीलाच सांडशी फेकून मारल्याचा प्रकार बुधवारी घडला आहे.

Wife wife beat her! | पत्नीची पतीला मारहाण !

पत्नीची पतीला मारहाण !

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पतीने पत्नीचा छळ करणे तसेच मारहाण करण्याचे अनेक प्रकार घडत आहेत; मात्र सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पत्नीने थेट पतीलाच सांडशी फेकून मारल्याचा प्रकार बुधवारी घडला आहे. याप्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीविरुद्धच मारहाणीचा गुन्हा सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनला बुधवारी दाखल केला. हा प्रकार चांगलाच चर्चेचा ठरला.
लहान उमरीतील रहिवासी शंकर चव्हाण यांची पत्नी सोनाली चव्हाण या दोघांमध्ये लहानसहान कारणावरून वाद सुरू आहेत. अशा वादातच सोनाली चव्हाण या बुधवारी सकाळी स्वयंपाक करीत असताना हा वाद पुन्हा उफाळला. त्यामुळे पत्नी सोनाली चव्हाण हिला राग अनावर झाला आणि तिने हातात असलेली सांडशी पतीच्या डोक्यात फेकून मारली. यामध्ये पती शंकरच्या डोक्याला दुखापत झाली आहे. पत्नीने मारहाण केल्यामुळे स्वाभिमान दुखावलेल्या शंकरने थेट पोलीस स्टेशन गाठून पत्नी सोनालीविरुद्ध मारहाणीची तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी शंकरची पत्नी सोनाली चव्हाण हिच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातच नव्हे, तर पोलीस विभागातही चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: Wife wife beat her!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.