विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता!
By Admin | Updated: May 5, 2015 01:25 IST2015-05-05T01:25:05+5:302015-05-05T01:25:05+5:30
चोवीस तासांत चंद्रपूर राज्यात सर्वाधिक हॉट.

विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता!
अकोला : पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर विदर्भात मंगळवारी पुन्हा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली असून, ८ मे रोजी विदर्भात पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, गत चोवीस तासांत विदर्भातील कमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्यात विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४५.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
यावर्षी जानेवारीपासूनच प्रत्येक महिन्यात अवकाळी पाऊस येत असून, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने उसंत दिली होती. तथापि पुन्हा अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले असून, सोमवारी राज्यात मराठवाडा व इतर ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भात ५ मे रोजी या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, गत चोवीस तासांत विदर्भात चंद्रपूर येथे ४५.१ अंश, तर अकोला ४३.९, अमरावती ४0.८, बुलडाणा ४0.२, नागपूर ४३.0, वाशिम ४१.२, वर्धा ४३.५ तर यवतमाळमध्ये ४२.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.