पांढरं सोनं काळवंडलं!, कापसाचे ‘अर्थशास्त्र’ कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:38 PM2018-06-17T23:38:56+5:302018-06-17T23:38:56+5:30

कापूस हे विदर्भातील मुख्य नगदी पीक असले, तरी राज्यातील मराठवाडा, खान्देशसह जवळपास सर्वच भागात आता घेतले जात आहे.

White gold is black, the 'economics of cotton' collapses | पांढरं सोनं काळवंडलं!, कापसाचे ‘अर्थशास्त्र’ कोलमडले

पांढरं सोनं काळवंडलं!, कापसाचे ‘अर्थशास्त्र’ कोलमडले

Next

राजरत्न सिरसाट 
अकोला : कापूस हे विदर्भातील मुख्य नगदी पीक असले, तरी राज्यातील मराठवाडा, खान्देशसह जवळपास सर्वच भागात आता घेतले जात आहे. म्हणूनच खरिपाच्या १ कोटी ४९ लाख हेक्टर क्षेत्रापैकी कापूस ४१.९८ लाख हेक्टर क्षेत्रावर टिकून आहे. कापूस पट्ट्यातील शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र या पिकावर अवलंबून आहे. वर्षभराची सर्व उधारी, उसणवारीचे व्यवहार याच पिकावर ठरलेले असतात. यामध्ये मुला-मुलींच्या लग्नाचाही समावेश आहे. म्हणूनच या पिकाला ‘पांढरं सोनं’ संबोधले जाते, पण पावसाची अनिश्चितता, उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने पांढरं सोनं काळवंडल्याचे दिसत आहे.
राज्यात मुख्यत्वे विदर्भ, मराठवाड्यात पारंपरिक पिकाऐवजी शेतकरी सोयाबीनच्या पिकाकडे वळला, पण पारंपरिक कापसाचे पीक शेतकरी घेतातच, म्हणूनच राज्यात गतवर्षी सोयाबीनचे ३८ तर कापसाचे क्षेत्र ४१.९८ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले होते. कापूस संवेदनशील पीक आहे. पेरणी ते काढणीपर्यंत या पिकाची काळजी घ्यावी लागते. खते, कीटकनाशके, कोळपणी, इतर आवश्यक या पिकांच्या गरजा पूर्णच कराव्या लागतात, पण उत्पादन खर्चावर दर मिळत नाही. या पिकाच्या उत्पादनावर वर्षाचे आर्थिक व्यवहार केलेले असल्याने शेतकरी ही परतफेड करू शकत नाहीत. परिणामी, कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकरी आत्महत्यासारखी टोकाची भूमिका घेत आहेत.
या वर्षीचा उत्पादन खर्च!
२०१७-१८ वर्षीचा उत्पादन खर्च हा हेक्टरी ४१ हजार ०६५ रुपये एवढा आला आहे. हेक्टरी सरासरी उत्पन्न हे २५ क्विंटल अपेक्षित होते. एवढे उत्पन्न जर झाले असते, तर आधारभूत किमतीनुसार ९७ हजार ५०० रुपये मिळाले असते. म्हणजेच यातून ४१ हजार ६५ रुपये वजा केले, तर शेतकºयांना ५६ हजार ४३५ रुपये नफा झाला असता, पण प्रत्येक वर्षी शेतकºयांसाठी हे मृगजळच ठरत आहे.
विदर्भाचे उत्पादन घटले!
मागील वर्षी विदर्भाला ३८ लाख गाठी कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात
३२ लाख गाठी उत्पादन झाले.
म्हणजेच विदर्भात २५ टक्के कापसाचे उत्पादन घटले.
>राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्टÑ, तसेच पश्चिम महाराष्टÑातील काही भागात कापसाचे पीक घेतले जाते. मागील वर्षी या क्षेत्रात १० टक्के वाढ झाली. म्हणजेच ४१.९८ लाख हेक्टरवर कापूस पीक घेण्यात आले. त्यामुळे उत्पादनाचे उद्दिष्ट हे १०० लाख गाठी होते. प्रत्यक्षात ८५ लाख गाठी उत्पादन झाले. २०१६-१७ मध्ये राज्यातील कापसाचे क्षेत्र ३८ लाख हेक्टर होते, पण उत्पादन ८८.५० लाख गाठी झाले होते. म्हणजेच २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ या वर्षी हे उत्पादन ३ लाख ५० हजार गाठी कमी आहे. कमी पाऊस आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर हा परिणाम झाल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला.
>वर्षे क्षेत्र उत्पादन उत्पन्न
(लाख/हे.) (लाख गाठी) (रू ई किलो/हे.)
२००८-०९ ३१.४३ ६२.०० ३५५
२००९-१० ३५.०३ ६५.७५ ३१९
२०१०-११ ३९.४२ ८७.७५ ३७८
२०११-१२ ४१.२५ ७६.०० ३१३
२०१२-१३ ४१.४६ ८१.०० ३३२
२०१३-१४ ४१.९२ ८४.०० ३४१
२०१४-१५ ४१.९० ८०.०० ३२४
२०१५-१६ ४२.०७ ७६.०० ३०७
२०१६-१७ ३८.०० ८८.५० ३९६
२०१७-१८ ४१.९८ ८५.०० ३४४
>आधारभूत किंमत
वर्ष मध्यम धागा लांब धागा
(प्रतिक्ंिवटल/रुपये)
२००९-१० २,५०० ३,०००
२०१०-११ २,५०० ३,०००
२०११-१२ २,८०० ३,३००
२०१२-१३ ३,६०० ३,९००
२०१३-१४ ३,७०० ४,०००
२०१४-१५ ३,७५० ४,०५०
२०१५-१६ ३,८०० ४,१००
२०१६-१७ ३,८६० ४,१६०
२०१७-१८ ४,०२० ४,३२०
मागील वर्षी कापसाला हमी दर ४,३२० रुपये प्रतिक्विंटल होता. सरासरी हेक्टरी उत्पादन बघितल्यास ४ क्व्ािंटल एवढेच होते. काही भागांत हे उत्पादन एक ते दोन क्ंिवटल एवढेच होते. हेक्टरी उत्पादन खर्च बघितल्यास तो ४१ हजार ०६५ एवढा आला. म्हणजेच मागील वर्षी शेतकºयांचे या पिकात प्रचंड नुकसान झाले.

Web Title: White gold is black, the 'economics of cotton' collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.