शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार रुपयांची लाच घेताना शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 16:47 IST

अकोला : जातवैधता सादर न करू शकल्याने सेवा समाप्त झालेल्या एका शिक्षीकेला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याच्या मोबदल्यात तिच्याकडे एक हजार रुपयांची लाच घेताना अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक व कनिष्ठ प्रशासन अधिकारी या दोघांना  लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी रंगेहात अटक केली.

ठळक मुद्देआकोट येथील तक्रारदाराच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. कैलास वासूदेव मसने व रामप्रकाश आनंदराव गाडगे अशी या लाचखोरांची नावे आहेत.शिक्षीकेला परत सेवेत रुजू करून घेण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याकरीता एक हजार रुपयांची लाच मागितली.

अकोला : जातवैधता सादर न करू शकल्याने सेवा समाप्त झालेल्या एका शिक्षीकेला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याच्या मोबदल्यात तिच्याकडे एक हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या  अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात वरिष्ठ सहायक व कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी लाच घेताना रंगेहात अटक केली.  कैलास वासूदेव मसने (४७)व रामप्रकाश आनंदराव गाडगे (५५)अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.आकोट येथील तक्रारदाराच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराची पत्नी शिक्षीका असून, जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकल्याने तीची सेवा शिक्षण विभागाकडून समाप्त करण्यात आली होती. त्यानंतर सदर शिक्षिकेने विभागीय आयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर सेवा समाप्तीच्या आदेशास स्थगिती मिळाली. त्यानंतर सदर शिक्षीकेला परत सेवेत रुजू करून घेण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याकरीता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात वरिष्ठ सहायक पदावर कार्यरत असलेल्या कैलास वासूदेव मसने व कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर तात्पूरत्या नेमणुकीवर कार्यरत असलेल्या रामप्रकाश आनंदराव गाडगे या दोघांनी शिक्षीकेच्या पतीकडे (तक्रारदार) एक हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्यामुळे त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली. त्यानूसार ‘एसीबी’च्या पथकाने मंगळवारी सापळा रचला. तक्रारदाराकडून आरोपींनी एक हजार रुपयांची रक्कम स्विकारताच दबा धरून बसलेल्या ‘एसीबी’च्या पथकाने दोघांना रंगेहाथ अटक करून, त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त केली.एसीबी अमरावती परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, अकोला एसीबीचे उपअधिक्षक संजय गोर्ले यांच्या नेतृत्वात पोलिस शिपाई संतोष, सुनील, इंगळे, येलोने, प्रवीण यांनी ही कारवाई केली.

 

टॅग्स :Akolaअकोलाzpजिल्हा परिषदCrimeगुन्हा