धाकट्या जावेने थोरलीला जाळले
By Admin | Updated: August 4, 2014 01:14 IST2014-08-04T01:14:05+5:302014-08-04T01:14:05+5:30
एका विवाहित महिलेची नात्याने धाकटी जाऊ लागत असलेल्या महिलेने जाळून हत्या

धाकट्या जावेने थोरलीला जाळले
बाळापूर: पैसे उसणवारीच्या क्षुल्लक कारणावरून एका विवाहित महिलेची नात्याने धाकटी जाऊ लागत असलेल्या महिलेने जाळून हत्या केल्याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी रविवारी आरोपी महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. यापूर्वी जळालेल्या महिलेच्या मृत्यूपूर्व जबाबावरून पोलिसांनी ३0७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. परंतु २ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी रविवार ३ ऑगस्ट रोजी त्याचे रुपांतर खुनाच्या गुन्हय़ात केले. पोलिस सुत्रांकडून प्राप्त माहितीनूसार, तालुक्यातील कान्हेरी गवळी येथील गीता दादाराव मुंडे (४५) व तीची चुलत धाकटी जाऊ सुनीता देवानंद मुंडे यांच्यात २६ जून रोजी उसणवारीच्या पैशांवरून वाद झाला. या वादावादीतून संतप्त होऊन सुनीता मुंडे हिने गिता हिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. त्यामुळे ती ७0 जळाली. तिला उपचारासाठी अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताचे सुमारास तिचा मृत्यू झाला. त्यामुळे संतत्प झालेल्या गीताच्या नातेवाईकांनी २६ जुनपासून फरार असलेली सुनीता मुंडे व तिचा पती देवानंद मुंडे यांना अटक करण्याची मागणी करीत रविवारी दुपारी मृतदेह बाळापूर पोलिस स्टेशनमध्ये आणला. दोषींना अटक करेपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका त्यांनी लावून धरली असता, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश गावडे यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी गीताचा मृतदेह तेथून हलविला व तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मनिषा राऊत करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)