निविदा बोलाविल्यानंतरही प्रत्यक्ष कामांना विलंब का ?

By Admin | Updated: April 24, 2015 02:12 IST2015-04-24T02:12:52+5:302015-04-24T02:12:52+5:30

महापौरांनी व्यक्त केली नाराजी, अकोला मनपाच्या प्रलंबित विषयांवर बैठक.

What is the delay in actual work even after calling the tender? | निविदा बोलाविल्यानंतरही प्रत्यक्ष कामांना विलंब का ?

निविदा बोलाविल्यानंतरही प्रत्यक्ष कामांना विलंब का ?

अकोला: महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना पुरविण्यात येणार्‍या सेवांमध्ये विलंब होत असल्याच्या अनुषंगाने महापौरांच्या दालनात मनपातील विभागप्रमुख, क्षेत्रीय अधिकारी यांची प्रलंबित मागण्यांवर आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत महापौर उज्वला देशमुख यांनी कामाच्या निविदा बोलाविल्यानंतरही प्रत्यक्ष काम सुरू होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली. कामाच्या निविदा वारंवार बोलाविल्यानंतरही प्रतिसाद न लाभल्यास प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही होत नसल्यानेच विकासकामांना खीळ बसली, असे सांगत तातडीने कामे मार्गी लावण्याचे निर्देश महापौरांनी अधिकार्‍यांना दिले तसेच विभागासंबंधी व कामाच्या स्थितीबाबत विभागप्रमुखांनी वेळोवेळी माहिती सादर करावी, असे सांगितले. शहरातील नागरिकांकरिता शहर बस वाहतूक सेवा सुरू करणे, जी.आय.एस. प्रकल्प राबविणे, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत खरेदी केलेल्या गाड्यांचे नियोजन करणे, पाणीपुरवठा संदर्भात नियोजन करणे, महान जलशुद्धीकरण केंद्रातील वाळू बदलणे, पंप खरेदी करणे, झोन कार्यालय अद्यावत करणे, एलईडी लाइट बसविण्याबाबत प्रस्ताव सादर करणे, ट्राफिक सिग्नल दरुस्त करणे, अग्निशमन विभागाकरिता साहित्य, वाहन खरेदी करणे, पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी आवश्यक कामे वेळेच्या आत पूर्ण करणे आदी बाबींवर चर्चा करण्यात आली. या सभेत महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी, आयुक्त शेटे, क्षेत्रीय अधिकारी डब्ल्यू. एस. वाघाळकर, अनिल बिडवे, कैलास पुंडे, राजेंद्र घनबहादूर, शहर अभियंता अजय गुजर, उपअभियंता अमोल डोईफोडे, विभागप्रमुख वसंत मोहोकार, विजय पारतवार, श्याम ठाकूर, एस. पी. काळे, प्रदीप चोरे, अरूण पाचपोर, राजेंद्र गोतमारे, डॉ. फारूख शेख, डॉ. विजया मोडक, श्याम बगेरे, सुरेश पुंड, विष्णू डोंगरे, मुलसिंग चव्हाण, सुरेश अंभोरे, विठ्ठल देवकते, संदीप गावंडे, आर. एन. ठाकरे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: What is the delay in actual work even after calling the tender?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.