शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील ५०२ धरणांत ४२ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:32 IST

अकोला : पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातील ५०२ धरणांत आजमितीस ४२.१२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात या धरणांमध्ये जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दोन महिन्यांत यातील २१ टक्के जलसाठा घटला आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातील ५०२ धरणांत आजमितीस ४२.१२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात या धरणांमध्ये जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दोन महिन्यांत यातील २१ टक्के जलसाठा घटला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर असून, अमरावती जिल्ह्यातील स्थिती बिकट आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये सप्टेंबर महिन्यात ६३.४८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला होता. हा जलसाठा आॅक्टोबरमध्ये स्थिर होता. नोव्हेंबर महिना लागताच यामध्ये घट सुरू झाली असून, २२ डिसेंबर रोजी या सर्व धरणामध्ये एकूण ४२.१२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. नळगंगा धरणात १३.५९, पेनटाकळी ८.३९ जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातीलच कोराडी मध्यम धरणातील जलसाठा केवळ शून्य टक्के आहे. तोरणा ९.५१ तर उतावळी धरणातील पातळी ३६.३३ टक्के साठा आहे. ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १६.७७ टक्के, पलढगमध्ये २५.०३ टक्के, मन धरणात २१.७२ टक्के साठा आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ६४.३४ टक्के, एकबुर्जी ६१.१५ तर सोनल धरणात ७०.३३ टक्के जलसाठा आहे.अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात आता केवळ २८.२८ टक्केच जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ८१.१८, अरुणावती ५७.४४ तर बेंबळा धरणात ३७.७३ टक्केच जलसाठा आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ६३.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ८०.६२ टक्के जलसाठा असून, उमा ६६.८७, मोर्णा धरणात ४२.४७ टक्के, तर वान धरणात ८१.८५ टक्के जलसाठा आहे.

यावर्षी वºहाडातील अकोला, वाशिम जिल्ह्यातील धरणात बऱ्यापैकी जलसाठा आहे. तथापि, लगतच्या बुलडाणा जिल्ह्यात कमी जलसाठा संचयित झाला. म्हणूनच अकोला, वाशिम जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी काळजीपूर्वक पाण्याचा वापर व नियोजन करणे गरजेचे आहे.अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीDamधरण