पश्चिम व-हाडात सरासरी ६२.४७ टक्के मतदान!
By Admin | Updated: October 16, 2014 00:55 IST2014-10-16T00:18:44+5:302014-10-16T00:55:08+5:30
पश्चिम व-हाडातील पंधरा विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी शांततेत मतदान.

पश्चिम व-हाडात सरासरी ६२.४७ टक्के मतदान!
अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम वर्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी शांततेत मतदान झाले. तिन्ही जिल्ह्यात सरासरी अंदाजे ६२.४७ टक्के मतदान झाले.
अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील १४,२३,0२९ मतदारांसाठी १,४८0 मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त होता. पाच मतदारसंघातील एकूण ९३ उमेदवारांचे भाग्य सायंकाळी ६ वाजता यंत्रबंद झाले. जिल्ह्यात सरासरी ५९ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आकोट मतदारसंघात अंदाजे ६५ टक्के, बाळापूरमध्ये ६२ टक्के, अकोला पश्चिममध्ये ५४ टक्के, अकोला पूर्वमध्ये ५८ टक्के, तर मुर्तिजापूर मतदारसंघात ५५ टक्के मतदान झाले.
बुलडाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढती होतील, असा अंदाज होता; मात्र मतदानाच्या दिवशी मतदारांचा कल हा तिरंगी लढतीकडे झुकल्याचे जाणवले. जिल्ह्यात एकूण मतदान सरासरी अंदाजे ६६.0८ टक्के झाले. बुलडाणा मतदारसंघात ५९.७९ टक्के, मलकापूर मतदारसंघामध्ये ६७.३८, चिखलीमध्ये ६७.३२, सिंदखेडराजा ६४.७६, मेहकरमध्ये ५९.८५, खामगावमध्ये ७३.८५, तर जळगाव जामोदमध्ये ६९.६५ टक्के मतदान झाले होते.
वाशिम जिल्हयातील तिन विधानसभा मतदारसंघासाठी सरासरी ६२.३३ टक्के मतदान झाले. वाशिम, कारंजा आणि रिसोड विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ५६ उमेदवार रिंगणात होते. रिसोड मतदारसंघात ५८ टक्के, कारंजा मतदारसंघात ६५ टक्के, तर वाशिम विधानसभा मतदारसंघात अंदाजे ६५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सरासरी ६२.३३ टक्के मतदान झाले.