खैर मोहम्मद प्लॉटमधून तलवारींचा साठा जप्त

By Admin | Updated: March 14, 2016 01:17 IST2016-03-14T01:17:48+5:302016-03-14T01:17:48+5:30

दोन अर्धवट बनविलेल्या तलवारी व तलवार बनविण्याचे साहित्य पकडले.

Well the sword stock was seized from Mohammed Plot | खैर मोहम्मद प्लॉटमधून तलवारींचा साठा जप्त

खैर मोहम्मद प्लॉटमधून तलवारींचा साठा जप्त

अकोला: डाबकी रोड पोलिसांनी खैर मोहम्मद प्लॉटमधील एका इसमाच्या घरात छापा मारून रविवारी ११ तलवारी जप्त के ल्या. यासोबतच दोन अर्धवट बनविलेल्या तलवारी व तलवार बनविण्याचे साहित्य डाबकी रोड पोलिसांनी जप्त केले. ठाणेदार विनोद ठाकरे यांच्यासह कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली. खैर मोहम्मद प्लॉटमधील झुलपुकार नगर येथील शहजाद खॉ आरीफ खॉ याच्या घरामध्ये तलवारी बनविण्यात येत असल्याची माहिती डाबकी रोड पोलिसांना मिळाली. यावरून डाबकी रोड पोलिसांनी त्याच्या घरी छापा मारला. या छाप्यात त्याच्या घरात पूर्ण बनविण्यात आलेल्या ११ तलवारी, दोन अर्धवट बनविलेल्या तलवारी, ग्राइंडर यासह तलवार बनविण्याच्या लोखंडासह साहित्य जप्त केले. डाबकी रोड पोलिसांनी आरोपी शहजाद खॉ आरीफ खॉ याला अटक केली असून, त्याच्याकडून ७ हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार विनोद ठाकरे यांच्यासह एपीआय पवार, पीएसआय मोगरे, पीएसआय चौधरी यांच्यासह कर्मचार्‍यांनी केली.

Web Title: Well the sword stock was seized from Mohammed Plot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.