राजनापुरात नववर्षाचे स्वागत स्वच्छता अभियानाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:19 IST2021-01-03T04:19:48+5:302021-01-03T04:19:48+5:30

मूर्तिजापूर : तालुक्यातील राजनपूर ग्रामपंचायत व सिद्धार्थ महिला बचत गटाच्या वतीने नववर्षाचे स्वागत सर्व गाव स्वच्छ करून करण्यात आले. ...

Welcome to New Year in Rajnapur with Swachhta Abhiyan | राजनापुरात नववर्षाचे स्वागत स्वच्छता अभियानाने

राजनापुरात नववर्षाचे स्वागत स्वच्छता अभियानाने

मूर्तिजापूर : तालुक्यातील राजनपूर ग्रामपंचायत व सिद्धार्थ महिला बचत गटाच्या वतीने नववर्षाचे स्वागत सर्व गाव स्वच्छ करून करण्यात आले. आठवड्यात दोन वेळा ग्रामसफाईचा उपक्रम राबविण्यात येतो.

राजनापूर ग्रामपंचायत ही विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी ग्रामपंचायत म्हणून तालुक्यात गणली जाते. यात सिद्धार्थ महिला बचत गटाचा सर्वात मोठा वाटा आहे. गटातील दहा महिला आठवड्यात दोन वेळा नित्यनेमाने गाव स्वच्छ करतात. यावर्षीसुद्धा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हातांमध्ये झाडू घेऊन गावातील या महिलांनी संपूर्ण गाव स्वच्छ करून नवीन वर्षाचे स्वागत केले. या माध्यमातून गाडगेबाबांचा दशसूत्री संदेशही देण्यात आला. या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रगती कडू यांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Web Title: Welcome to New Year in Rajnapur with Swachhta Abhiyan