फळ विक्रेत्यांची वजनात ‘दांडी
By Admin | Updated: October 3, 2014 01:24 IST2014-10-03T01:24:44+5:302014-10-03T01:24:44+5:30
लोकमत स्टिंग ऑपरेशन: एक किलो विकत घेतल्यास मिळते ७५0 ग्रॅम फळं.

फळ विक्रेत्यांची वजनात ‘दांडी
सचिन राऊत/प्रवीण ठाकरे /अकोला
जनता भाजी बाजारातील फळ विक्रेते वगळता भाजी बाजारासमोरील व शहराच्या छोट्या बाजार पेठेतील फळ विक्रेते एक किलो फळामागील वजनात तब्बल २00 ते २५0 ग्रॅम दांडी मारीत असल्याचे उघडकीस आले. ह्यलोकमतह्णने गुरुवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा प्रकार उघडकीस आला.
जनता भाजी बाजार फळांची मोठी बाजारपेठ आहे. या व्यतिरिक्त जठारपेठ, सिंधी कॅम्प, गोरक्षण रोड व जनता भाजी बाजारासमोरील भिंतीलगत तसेच श्रीकृष्ण द्वार आणि श्रीराम द्वार परिसरातून फळांची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. जनता भाजी बाजार वगळता भाजी बाजारासमोरील फळ विक्रेते, सिंधी कॅम्प व जठारपेठ तसेच श्रीकृ ष्ण आणि श्रीराम द्वारासमोरील फळ विक्रेते वजनात दांडी मारीत असल्याचे ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले. जनता भाजी बाजारातून एक किलो सफरचंद विकत घेतले. त्यानंतर हेच सफरचंद इलेक्ट्रॉनिक वजन यंत्रावर मोजले असता त्यात किरोकळ फरक आढळून आला. त्यानंतर जनता भाजी बाजारासमोरील फळ विक्रेत्यांकडून एक किलो सफरचंद घेऊन ते मोजले असता, ते तब्बल २७0 ग्रॅम कमी भरले. सिंधी कॅम्पमधील फळ विक्रेत्यांकडून फळ घेतल्यानंतर वजन केले असता त्यात १६0 ग्रॅम कमी वजन आढळून आले. जठारपेठ परिसरातील फळ विक्रेत्यांकडून विकत घेतलेल्या फळांमध्ये ५0 ते ६0 ग्रॅम वजन कमी आढळून आले. त्यामुळे जनता भाजी बाजार वगळता इतर ठिकाणचे फळ विक्रेते ग्राहकांची फसवणूक करीत असल्याचे स्पष्ट झाले.