लग्नमंडपी गर्दी; वधूपित्याला २० हजाराचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 21:23 IST2021-04-05T21:23:14+5:302021-04-05T21:23:48+5:30
Khamgaon : तिनशेच्या वर वऱ्हाडी मंडळी जमल्याने वधूपित्याला दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागले असून त्यांच्या कडून २० हजार दंड ठोठावण्यात आला आहे.

लग्नमंडपी गर्दी; वधूपित्याला २० हजाराचा दंड
मूर्तिजापूर : तालुक्यातील कानडी बाजार येथे ठरल्या तिथी प्रमाणे ५ एप्रिल रोजी लग्न समारंभ आयोजित करण्यात आला खरे पण कोरोना नियमांचा भंग करुन या लग्नात तब्बल तिनशेच्या वर वऱ्हाडी मंडळी जमल्याने वधूपित्याला दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागले असून त्यांच्या कडून २० हजार दंड ठोठावण्यात आला आहे.
तालुक्यातील कानडी येथील दिलीप शेषराव अधम यांना मुलीचा विवाह एका मंदिर परिसरात आयोजित केला होता,नियमाप्रमाणे लग्न मंडपी ५० वऱ्हाडी मंडळींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असताना या लग्नसोहळ्यात तिनशेच्या वर वऱ्हाडी उपस्थित झाले होते. या संदर्भात उपविभागीय अधिकारी अभयसींह मोहिते यांना माहिती मिळताच संबधित मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांना निर्देशित करुन अशी एक टीम लग्नमंडपी पाठवून तिथला आढावा घेतला असता विवाह सोहळ्यात तिनशेच्या वर लोक आढळून आले, नियमाचा भंग केल्याने वधूपित्याला २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.