खपाटे हत्याकांडातील आरोपींकडून शस्त्र जप्त

By Admin | Updated: July 3, 2017 02:07 IST2017-07-03T02:07:45+5:302017-07-03T02:07:45+5:30

अकोला : हरिहरपेठेतील गाडगे नगरात राहणारा विकास ऊर्फ विक्की अशोक खपाटे याची हत्या करण्यासाठी वापरलेले लोखंडी पाइप, फरशी कुऱ्हाड रविवारी पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले.

Weapons seized from the killers of Khapate killings | खपाटे हत्याकांडातील आरोपींकडून शस्त्र जप्त

खपाटे हत्याकांडातील आरोपींकडून शस्त्र जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : हरिहरपेठेतील गाडगे नगरात राहणारा विकास ऊर्फ विक्की अशोक खपाटे याची हत्या करण्यासाठी वापरलेले लोखंडी पाइप, फरशी कुऱ्हाड रविवारी पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले. आरोपींनी हे शस्त्र लपवून ठेवले होते. २६ जून रोजी दुपारी व्याजाच्या पैशांच्या वादातून विकास खपाटे याच्यावर करण शाहू, चेतन शाहू, नितीन शाहू, राजू काटोले यांनी लोखंडी पाइप, फरशी कुऱ्हाडीने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर आरोपी फरार झाले होते. विकास खपाटे याची आई सुशीला खपाटे हिच्या तक्रारीनुसार, जुने शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला होता. आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांसह जुने शहर पोलिसांनी कारंजा, अमरावती आणि नागपूर येथे पोलीस पथके पाठविली होती. गुरुवारी जुने शहर पोलिसांनी नितीन शाहू, करण शाहू यांना सायंकाळी मूर्तिजापूर येथून अटक केली होती.
 

Web Title: Weapons seized from the killers of Khapate killings