आठ अंगणवाड्या ‘आयएसओ’च्या वाटेवर
By Admin | Updated: July 20, 2014 01:59 IST2014-07-20T01:24:03+5:302014-07-20T01:59:42+5:30
अमरावती विभागात लोणार पॅटर्नचा दबदबा

आठ अंगणवाड्या ‘आयएसओ’च्या वाटेवर
मयूर गोलेच्छा / लोणार
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील आठ अंगणवाडया ह्यइंटरनॅशनल ऑर्गनायजेशन फॉर स्टँडर्डडायझेशनह्ण (आयएसओ)च्या मानांकनासाठी सज्ज झाल्या आहेत. या अभिनव उपक्रमामुळे अमरावती विभागात लोणार पॅटर्नचा दबदबा निर्माण झाला आहे.
शून्य ते सहा वयोगटातील बालकांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांना नियमीत पोषण आहार मिळावा या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या अंगणवाडी उपक्रमांतर्गत, लोणार तालुक्यात सद्य स्थितीत १८0 अंगणवाडी केंद्रे सुरू आहेत. या अंगणवाडयांमध्ये आनंददायी शिक्षण देण्याची प्रणाली राबविण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी एम. एस. वासनिक यांनी पुढाकार घेतला. त्यांनी प्रत्येक अंगणवाडीचा आढावा घेऊन, त्यासाठी एक नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आणि अंगणवाडी केंद्रांच्या संचलनात मोठे बदल घडवून आणले. त्या अंतर्गत तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी ह्यड्रेस कोडह्ण लागू करण्यात आला. त्यांना बालखुर्ची, बालगीते दाखविण्यासाठी दूरचित्रवाणी संच व ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आले. भिंतींवर रंगरंगोटी करुन, त्या माध्यमातून बालकांना प्राण्यांची, अक्षरांची माहिती करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हा उपक्रम राबविण्यासाठी गावातील नागरिकांना आर्थिक मदतीचे आवाहन डॉ. वासनिक यांनी केले. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने, तालुक्यातील गायखेड, आरडव, सुलतानपूर, किन्ही, सोनुना, गुंधा, सरस्वती, भानापूर येथील अंगणवाड्या अतिशय सुसज्ज झाल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या वतीने आता या आठ अंगणवाड्यांच्या आयएसओ मानांकनासाठी प्रस्ताव सादर केले जाणार आहेत. अमरावती विभागात एकूण ११ हजार १0९ अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यापैकी ११ हजार ६७ कार्यरत आहेत; परंतु यापूर्वी विभागातील एकाही जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रांना आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न झालेला नाही.
अमरावती विभागात एकही अंगणवाडी केंद्र आयएसओ दर्जा प्राप्त नाही. लोणार तालुक्यातील आठ अंगणवाड्या लोकसहभागातून ह्यहाय टेकह्ण करण्यात आल्या असून, इतर अंगणवाडयाच्या विकासासाठी ह्यलोणार मॉडेलह्ण जिल्हाभर राबविणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. डी. कराळे यांनी सांगीतले