व्वा रे वा स्वच्छता अभियान!
By Admin | Updated: October 3, 2014 01:26 IST2014-10-03T01:26:57+5:302014-10-03T01:26:57+5:30
मनपाच्या शपथ कार्यक्रमात बीअरच्या बाटल्यांचा खच!

व्वा रे वा स्वच्छता अभियान!
आशिष गावंडे / अकोला
महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त महापालिका प्रशासनाने आयोजित केलेल्या भारत स्वच्छता अभियानच्या शपथ कार्यक्रमात व्यासपीठाच्या मागे चक्क बीअरच्या रिकाम्या बाटल्यांचा खच व ठिकठिकाणी घाण साचल्याचे लाजिरवाणे चित्र गुरुवारी समोर आले.
महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनानिमित्त केंद्र शासनाच्या आदेशानुसार ह्यभारत स्वच्छता अभियानह्ण राबविले जात आहे. त्यानुषंगाने मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी २ ऑक्टोबर रोजी डॉ.बाबासाहेब खुले नाट्यगृहात शपथ कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच मोठा गाजावाजा करीत शहरातील विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख रस्त्यावर स्वच्छता अभियान राबवले. महापालिकेचा हेतू स्वच्छ असावा, यात दुमतच नाही; परंतु झाले नेमके उलटेच.
महापालिकेतर्फे स्वच्छतेचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असलेल्या परिसराचीही स्वच्छता प्रशासनातर्फे घेण्यात आले नाही. त्यामुळे व्यासपीठाच्या मागील बाजूने बीअरच्या रिकाम्या बाटल्यांचा खच व घाण पसरल्याचे लाजिरवाणे चित्र समोर आले.