मनपाच्या नाकावर टिच्चून पाणी चोरी

By Admin | Updated: May 12, 2015 01:44 IST2015-05-12T01:44:23+5:302015-05-12T01:44:23+5:30

सोनटक्के प्लॉट, हरिहरपेठ, पोळा चौकात मुख्य जलवाहिनीला ‘टॅपिंग’.

Water theft from the municipal naka | मनपाच्या नाकावर टिच्चून पाणी चोरी

मनपाच्या नाकावर टिच्चून पाणी चोरी

आशीष गावंडे/अकोला : बाश्रीटाकळी ग्रामपंचायतप्रमाणेच अकोलेकरांनीदेखील चक्क मुख्य जलवाहिनीला ठिकठिकाणी फोडून (टॅपिंग करून) सर्रास पाण्याची लूट चालवल्याचे धक्कादायक वास्तव जुने शहरातील सोनटक्के प्लॉट, हरिहरपेठ, पोळा चौक भागात उघडकीस आले आहे. हा सर्व प्रकार महापालिकेच्या जलप्रदाय विभागाला माहिती असतानासुद्धा आजपर्यंत प्रशासनाने अवैध नळ जोडणीला आळा घातला नाही, हे येथे उल्लेखनीय. महान येथून अकोला शहराकडे येणार्‍या मुख्य जलवाहिनीची बाश्रीटाकळी ग्रामस्थांनी अक्षरश: चाळण केली. शहरात पाण्याची चणचण भासत असताना ग्रामस्थांना मात्र कोणत्याही विजेशिवाय चोवीस तास पाणी उपलब्ध झाले. या सर्व प्रकाराला ग्रामपंचायतचे दुटप्पी धोरण कारणीभूत असल्याचे मनपाच्या कारवाईत दिसून आले. तत्कालीन उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, उपायुक्त माधुरी मडावी यांनी बाश्रीटाकळी गावातील अवैध जलवाहिन्यांची तोडफोड करीत पाणीपुरवठा बंद केला. हाच प्रकार जुने शहरातील सोनटक्के प्लॉट, हरिहरपेठ, पोळा चौक भागात सुरू आहे. हरिहरपेठस्थित जलकुंभात ५00 व्यासाच्या मुख्य पाइपलाइनद्वारे जलसाठा केल्यानंतर हीच पाइपलाइन भांडपुरा चौकानजिकच्या शिवनगरस्थित जलकुंभापर्यंत आणण्यात आली. हरिहरपेठ, राहुलनगर, पोळा चौक आणि सोनटक्के प्लॉट भागातील नागरिकांनी चक्क मुख्य जलवाहिनीलाच ह्यटॅपिंगह्ण करीत घरोघरी नळाद्वारे पाण्याचा फुकटात वापर सुरु केला. हरिहरपेठ तसेच शिवनगर परिसरातील जलकुंभातून संपूर्ण जुने शहराला पाणीपुरवठा केला जातो. अर्थातच, टॅपिंगद्वारे घेतलेल्या पर्यायी जलवाहिनीतून प्रचंड दाबाने व चोवीस तास पाण्याचा बिनधास्त वापर सुरू आहे. परिणामी खैरमोहम्मद प्लॉट, भगिरथ वाडी, आरपीटीएस रोड, वानखडेनगर, फडकेनगर, रेणुकानगर, श्रीराम चौक, गोडबोले प्लॉट, चिंतामणीनगर आदी दाट लोकवस्तीच्या भागात पाणीपुरवठाच होत नसल्याची परिस्थिती आहे.

Web Title: Water theft from the municipal naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.