पाणीपुरवठा हस्तांतरणाची मागवली माहिती
By Admin | Updated: December 9, 2014 00:38 IST2014-12-09T00:38:21+5:302014-12-09T00:38:21+5:30
नगर विकास राज्यमंत्र्यांचे मनपाला निर्देश

पाणीपुरवठा हस्तांतरणाची मागवली माहिती
अकोला: शहराचा पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे हस्तांतरित करण्याच्या मुद्यावर नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी यासंदर्भातील सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले. त्यानुषंगाने सोमवारी सायंकाळी शहर अभियंता अजय गुजर नागपूरकडे रवाना झाले.
महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील पम्पिंग मशीनमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठय़ावर झाला असून, अनियमित पाणीपुरवठय़ामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी मनपाने सन २00६ मध्ये घेतल्यानंतर आजवर मनपाकडून पम्पिंग मशीन बदलण्यात आली नाही. त्याचे परिणाम आता समोर येत असून, पम्पिंग मशीनची ह्यलाईफह्ण संपल्याने पाणीपुरवठय़ाची समस्या निर्माण होत आहे. यामुळे मनपाकडील पाणीपुरवठय़ाची जबाबदारी मजीप्राकडे सोपविण्यासाठी आमदार गोपीकिशन बाजोरिया प्रयत्नरत आहेत. मनपाने सुद्धा शहराचा पाणीपुरवठा मजीप्राकडे हस्तांतरित करण्याचा ठराव पारित केला आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आ.बाजोरिया यांनी पुन्हा हा प्रश्न शासन दरबारी उपस्थित केला आहे. त्यानुषंगाने नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी यासंदर्भातील सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश मनपाला दिले