अकोला शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
By Admin | Updated: November 5, 2015 01:57 IST2015-11-05T01:57:44+5:302015-11-05T01:57:44+5:30
नवीन विद्युत पॅनल बसविण्याचे काम सुरू.

अकोला शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
अकोला : महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर नवीन विद्युत पॅनल बसविण्याचे काम सुरू करण्यात आले. यामुळे बुधवारपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने समोर ढकलण्यात आला आहे. महान जलशुद्धीकरण केंद्रावर आगामी दिवसात नवीन पम्पिंग मशीन बसविल्या जाणार आहेत. जुन्या मशीन कालबाह्य झाल्यामुळे नवीन पंप व मशीनसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला. त्यानुषंगाने जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे. बुधवारी नवीन विद्युत पॅनल बसविण्याचे काम सुरू क रण्यात आले असून, याचा परिणाम पाणीपुरवठा यंत्रणेवर झाला. तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने समोर ढकलण्यात आल्याचे जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी कळविले आहे.