अकोला शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
By Admin | Updated: April 15, 2015 01:48 IST2015-04-15T01:48:22+5:302015-04-15T01:48:22+5:30
महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शहरातील पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक पूर्णत: विस्कळीत.
_ns.jpg)
अकोला शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
अकोला : महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शहरातील पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक पूर्णत: विस्कळीत झाले आहे. मंगळवारी जुने शहरातील काही भागांना पाणीपुरवठा करण्यात आला असला तरी नागरिकांना गढूळ व दूषित पाण्याचा सामना करावा लागला. तीन दिवसांपूर्वी महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक बिघाड झाला. त्याच्या दुरुस्तीला दोन दिवस लागले. यादरम्यान मनपाच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोलमडले. तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर पाणीपुरवठा सुरू केला असता, नागरिकांना गढूळ व दूषित पाण्याचा सामना करावा लागला. जुने शहरातील जयहिंद चौक, अगरवेस रोड, विठ्ठल मंदिर परिसर, काळा मारुती परिसर,राजेश्वर मंदिर, शिवचरण मंदिर परिसरात पाणी पोहोचण्यास विलंब लागतो. अशा स्थितीत या भागात केवळ एक तास पाणीपुरवठा होतो. भगिरथ वाडी, भगतवाडी, आरपीटीएस रोड आदी भागांत पाणी पोहोचत नसल्याने या भागातील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.