आगरचा पाणीपुरवठा २५ दिवसांपासून बंद
By Admin | Updated: October 15, 2014 01:26 IST2014-10-15T01:26:54+5:302014-10-15T01:26:54+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : ग्रामस्थ पिताहेत शेततळय़ाचे दूषित पाणी.

आगरचा पाणीपुरवठा २५ दिवसांपासून बंद
आगर (अकोला): खांबोरा पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या अकोला तालुक्यातील आगर गावाला गत २५ दिवसांपासून पाणीच मिळाले नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. खारपाणपट्टय़ात येत असलेल्या या गावात िपण्याच्या पाण्याचा दुसरा कोणताही स्रोत नसल्याने ग्रामस्थांना नाईलाजाने शेततळी किंवा मोर्णा नदीचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. अकोला तालुक्यातील आगर व परिसरातील गावांना मूर्तिजापूर तालुक्यातील खांबोरा येथील ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेद्वारा पाणीपुरवठा केला जातो. आतापर्यंत आगरला आठवड्या तून दोन दिवस पाणी मिळत होते. दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना अतिसार व इतर जलजन्य आजारांनी ग्रासले आहे. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज २00 व्या वर रुग्णांची नोंद होत आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागत असले, तरी प्रशासनाला त्याचे काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामस्थ याबाबत संबंधित अधिकार्यांशी सं पर्क करण्याचा प्रयत्न करतात; परंतु ते सतत नॉट रिचेबल असल्याने त्यांची निराशा होत आहे.