काटेपूर्णाचा जलसाठा ४0 टक्क्यावर!
By Admin | Updated: September 28, 2014 02:00 IST2014-09-28T01:45:21+5:302014-09-28T02:00:40+5:30
काटेपूर्णा प्रकल्पाची पातळी ३४.५१ दशलक्ष घन मीटर म्हणजे ४0 टक्कय़ावर स्थिरावली.

काटेपूर्णाचा जलसाठा ४0 टक्क्यावर!
अकोला : अल्प पावसामुळे अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात केवळ ४0 टक्के जलसाठा शिल्लक असून, या प्रकल्पात गाळाचे प्रमाण अधिक असल्याने हा जलसाठा प्रत्यक्षात ३0 टक्केच आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्य़ात पाणीटंचाईचे सकंट उभे ठाकले आहे.
यंदा जिल्हय़ाला अपेक्षित पाऊस झाला नसल्याने निगरुणा, वाण हे मध्यम व पोपटखेड या लघू पाटबंधार्याच्या जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली असली तरी पिण्याच्या पाण्याचा स्रोत असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पाची पातळी ३४.५१ दशलक्ष घन मीटर म्हणजे ४0 टक्कय़ावर स्थिरावली असून, मोर्णा या प्रकल्पात २४.४९ दलघमी म्हणजेच ५९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मूर्तिजापूर तालुक्या तील उमा या प्रकल्पात केवळ २.९४ दलघमी म्हणजे २५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील दगडपारवा या धरणाची पातळी आजही शून्य टक्केच आहे.
तेल्हारा तालुक्यातील वाण व पोपटखेड धरण सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असल्याने या धरणातील जलसाठा अनुक्रमे ९६ व ९१ टक्के आहे.