शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

 अकोला जिल्ह्यातील जलसंकट तीव्र ; धरणात अल्प जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 14:01 IST

अकोला: जिल्ह्यातील उमा धरण आटले असून, उर्वरित धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उरल्याने हाहाकार माजला आहे. सूर्य ३७ ते ३९ अंशांवर पोहोचला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील काटेपूर्णा, मोर्णा, निर्गुणा या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. उमा धरण आटले असून, दगडपारवा धरणात पाणीच नाही. वाण धरण वगळता इतर धरणांत पाणी अत्यल्प उरले आहे.

अकोला: जिल्ह्यातील उमा धरण आटले असून, उर्वरित धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उरल्याने हाहाकार माजला आहे. सूर्य ३७ ते ३९ अंशांवर पोहोचला आहे. एप्रिल-मे महिन्यात ही तीव्रता ४५ अंशांवर जाते. या उन्हातच दिवसेंदिवस धरणात उरलेले पाणीही आटत चालले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जलसंकट तीव्र झाले आहे. प्रशासकीय पातळीवर यासाठी कोणती ठोस पावले उचलली, असा प्रश्न जिल्हावासीयांकडून विचारला जात आहे.जिल्ह्यातील काटेपूर्णा, मोर्णा, निर्गुणा या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. उमा धरण आटले असून, दगडपारवा धरणात पाणीच नाही. काटेपूर्णा धरणातील पाणीही पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. वाण धरण वगळता इतर धरणांत पाणी अत्यल्प उरले आहे. प्रमुख धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवले असल्याने उन्हाळी पिकांना फाटा देण्यात आला आहे. आतापासूनच जिल्ह्यातील गावांत पाणी टंचाई जाणवत आहे. एप्रिल, मे महिन्यात तीव्र उन्हाळ्याला सामोरे जावे लागणार आहे. जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाला सुरुवात झाली, तरी जुलै, आॅगस्टच्या पावसाच्या जोरावर धरणे भरायला सप्टेंबर उजाडावा लागणार आहे.

मशागतीची कामे थांबली!रब्बी पिकांच्या काढणीनंतर जागोजागी नांगरटी केली जाते. जेवढे ऊन जास्त तेवढे नांगरटी केलेल्या जमिनीला फायदा मोठा होतो. यावर्षीही पावसाच्या अनिश्चिततेचे भाकीत वर्तविण्यात येत असल्याने पावसाळ्यात तरी पाऊस पडेल का, याबाबत साशंक असणाऱ्या शेतकºयांनी नांगरटी, मशागतीची कामे थांबविली आहेत.

 काटेपूर्णा धरणात अल्प जलसाठासात लाखांवर लोकसंख्या असलेल्या अकोलेकरांची जीवनरेखा असलेल्या काटेपूर्णा धरणात केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक असून, यात अर्धा गाळ असल्याने या धरणातील जलसाठ्याने तळ गाठला आहे. पाणी कमी असल्याने अगोदरच या धरणातून मूर्तिजापूर, साठ खेडी व अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी नाकारले आहे; पण या धरणातील अल्प पाण्यात पुढील सप्टेंबरपर्यंत अकोलेकरांची तहान भागेल का, असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे. 

धरणातील उपलब्ध जलसाठाकाटेपूर्णा - १०.९ टक्केमोर्णा - १२.८१ टक्केनिर्गुणा - २०.५९ टक्केउमा - ०.० टक्केदगडपारवा - ०.० टक्केवाण - ७७.९१ टक्के

 काटेपूर्णा धरणात १० टक्के एवढा जिवंत; परंतु अल्प जलसाठा आहे. त्यानंतर मृतसाठा उचलता येईल. यात गाळही आहे. त्यामुळे पाण्याचे आता काटेकोर नियोजन करावे लागणार असून, पाण्याचा अपव्यय टाळावा लागेल.जयंत शिंदे,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरणWaterपाणी