वान प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच !
By Admin | Updated: August 3, 2016 01:49 IST2016-08-03T01:49:17+5:302016-08-03T01:49:17+5:30
अकोल्याची चिंता मिटली : काटेपूर्णा धरणात ५५.९ टक्के जलसाठा!
_ns.jpg)
वान प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच !
अकोला : जिल्हय़ातील धरणांतील जलसाठय़ात वाढ झाली आहे. वान धरणाचे चार वक्रद्वार पाच दिवसांपासून उघडे असून, मंगळवारी १0 सें.मी.म्हणजेच या धरणातून प्रतिसेकंद २२.५0 घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या आणि जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या काटेपूर्णा धरणात आजमितीस केवळ ४७.५७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ५५.0९ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे अकोलेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
पातूर तालुक्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १७.६१ दलघमी (४२.४८ टक्के), निगरुणा २३.0८ दलघमी (८0 टक्के)जलसाठा संकलीत झाला असून, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा ७.0७६ दलघमी (६0.५४ टक्के), तेल्हारा तालुक्यातील वान ६0.५८ दलघमी (७३.९२ टक्के), अकोट तालुक्यातील पोपटखेड लपा ९.६0 दलघमी (८८.५५ टक्के) तर बाश्रीटाकळी तालुक्यातील दगडपारवा या धरणात १.९६ दलघमी म्हणजेच १९.१४ टक्के जलसाठा संचयित झाला आहे.