तेल्हारा तालुक्यातील ६९ गावांचा पाणी प्रश्न मार्गी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:19 IST2021-03-05T04:19:39+5:302021-03-05T04:19:39+5:30
तेल्हारा: गेल्या अनेक दशकांपासून वान धरण तालुक्यात असतानाही तालुक्यातील जनतेला पाणी मिळत नव्हते. पाणी न मिळाल्याने शिवसेनेचे जिल्हा ...

तेल्हारा तालुक्यातील ६९ गावांचा पाणी प्रश्न मार्गी!
तेल्हारा: गेल्या अनेक दशकांपासून वान धरण तालुक्यात असतानाही तालुक्यातील जनतेला पाणी मिळत नव्हते. पाणी न मिळाल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी प्रयत्नांची शिकस्त करीत, तालुक्यातील ६९ गावांमध्ये वान धरणाची पाणी पुरवठा योजनेचा देखभाल दुरुस्तीचा ठराव जिल्हा परिषदेच्या सभेत मंजूर करून घेतला. त्यामुळे तालुकावासीयांना वान धरणाचे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
वान धरण ज्या तालुक्यात आहे. त्या तालुक्यातील जनतेला अनेक दशकांपासून धरणाचे पिण्याचे पाणी मिळत नव्हते. याच धरणाचे पाणी राजकारण्यांनी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर नेले. मात्र धरणाच्या खाली वसलेल्या गावांना धरणातील पाणी मिळत नव्हते. तालुक्यातील बराचसा भाग हा खारपाणपट्यात येत असल्याने खारे पाणी जनतेला पिणे भाग पडत होते. त्यामुळे अनेक नागरिक किडनी आजाराने त्रस्त होते. तसेच उन्हाळ्यात पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत होते. जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने शिवसेनेचे बेलखेड सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी प्रयत्न सुरू केले. सर्वप्रथम पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन समस्या सोडविण्याची मागणी करून पाठपुरावा सुरू केला. जिल्हा परिषदेच्या गुरूवारच्या सभेत देखभाल दुरुस्तीचा ठराव सुद्धा सर्वानुमते मंजूर करून घेतला. त्यामुळे आता तालुक्यातील ज्या गावात वान धरणाचे पिण्याचे पाणी पोहोचले नव्हते. त्या सर्व ६९ गावांमध्ये वान धरणाचे पाणी पोहोचणार असल्याने तालुकावासीयांची तहान मिटणार आहे.
फोटो: