व-हाडात पाणीटंचाईचे संकट !
By Admin | Updated: September 7, 2015 23:32 IST2015-09-07T23:32:59+5:302015-09-07T23:32:59+5:30
काटेपूर्णा २७ टक्के ; दगडपारवा शून्य, कोराडीत ४ टक्के जलसाठा.

व-हाडात पाणीटंचाईचे संकट !
अकोला : पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात पुरक पाऊस झाला नसल्याने या विभागात जलसंकट निर्माण आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात केवळ २७ टक्के जलसाठा शिल्लक असून, दगडपारवा शून्यावर, तर बुलडाणा जिल्हय़ातील कोराडी धरणात ४ टक्के जलसाठा आहे. यावर्षी पावसाळा संपायला आला तरी पुरक पाऊस झाला नसल्याने पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ातील मोठे, मध्यम, लघू प्रकल्पात पूरक जलसाठा संकलित झाला नाही. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस २७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. आता तर पाऊस नाही आणि तापमानात वाढ झाल्याने या धरणाची पातळी झपाट्याने कमी होत आहे. अकोला जिल्हय़ातील मोर्णा या मध्यम प्रकल्पात ३८ टक्के, निगरुणा ४९ टक्के, तर उमा या मध्यम प्रकल्पात २८ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या प्रकल्पात आजमितीस २४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ज्ञानगंगा प्रकल्प ४३ टक्के, मस २६ टक्के, कोराडी ४ टक्के, तर पलढग या प्रकल्पात ५४ टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्हय़ातील पूस या मोठय़ा प्रकल्पात ५१ टक्के जलसाठा शिल्लक असून, लोअरपूसमध्ये ८७ टक्के साठा आहे. सायखेडा या प्रकल्पात ९९ टक्के, गोकी ९९ टक्के, वाघाडी ९९ टक्के व बोरगाव या मध्यम प्रकल्पात ८८ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्हय़ातील सोनल व एकबुर्जी प्रकल्प पातळीची अवस्था सुधारण्याची शक्यता आहे. तेल्हारा तालुक्यातील वाण प्रकल्पात ८६ टक्के तर आकोट तालुक्यातील पोपटखेड प्रकल्पात ८६.६४ टक्के जलसाठा आहे. काटेपूर्णा प्रकल्प जलग्रहण क्षेत्रात अद्याप पूरक पाऊस झाला नसल्याने काटेपूर्णा धरणात आजमितीस २७ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे या प्रकल्पात आहे त्या जलसाठय़ाचे काटेकोर व्यवस्थापन करावे लागणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी स्पष्ट केले.
*मध्यम प्रकल्प पडले कोरडे
अकोला जिल्हय़ातील दगडपारवा या धरणाची पातळी शून्य टक्के असून, बुलडाणा जिल्हय़ातील कोराडी धरणात केवळ ४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. इतर धरणातील पातळी कमी होत आहे.