सुवर्णा नदीपात्रात लघुपाटबंधारे विभाग सोडणार पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST2021-04-21T04:18:54+5:302021-04-21T04:18:54+5:30
त्यामुळे सुवर्णा नदीपात्रात लघुपाटबंधारे तलावांमधील पाणी लवकरच सोडण्यात येणार असल्यामुळे गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सुवर्णा नदीच्या ...

सुवर्णा नदीपात्रात लघुपाटबंधारे विभाग सोडणार पाणी!
त्यामुळे सुवर्णा नदीपात्रात लघुपाटबंधारे तलावांमधील पाणी लवकरच सोडण्यात येणार असल्यामुळे गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सुवर्णा नदीच्या काठावरील पातूर, बोडखा, शिर्ला, भंडारज, तांदळी, बेलुरा आदी गावांना फायदा होणार आहे. कृषी महाविद्यालयाने याबाबत पुढाकार घेतल्याने सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघ आणि गावकऱ्यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव व सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्लाचे अध्यक्ष कृष्णा अंधारे यांचा सत्कार करण्यात आला. उन्हाळ्यात सुवर्णा नदीचे पात्र कोरडेठाण पडले आहे. मुक्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या विहिरींची पाण्याची पातळी खाेल गेल्यामुळे बागायती पिकांवर परिणाम होत आहेत. ही बाब कृष्णा अंधारे यांनी हेरून दहा हजार रुपयांचा धनादेश कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्याकडे जमा केला.