व-हाडातील जलसाठय़ात वेगाने घसरण!
By Admin | Updated: March 15, 2016 02:10 IST2016-03-15T02:10:14+5:302016-03-15T02:10:14+5:30
काटेपूर्णा प्रकल्पात केवळ १३.४१ टक्के जलसाठा शिल्लक.

व-हाडातील जलसाठय़ात वेगाने घसरण!
अकोला: पश्चिम विदर्भातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, धरणांमधील जलसाठय़ाची पातळी वेगाने घसरत असल्याने पाणीटंचाईचे संकट गंभीर झाले आहे. तापमानही ४0 अंशाच्या वर गेल्याने पाण्याचे बाष्पीभवन 0.९ मि.मी. वेगाने होत असून, पंधरा दिवसांत ५ ते २0 टक्के जलसाठय़ात घसरण झाली आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा धरणात केवळ १३.४१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्हय़ातील दगडपारवा व बुलडाणा जिल्हय़ातील कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे.
अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा धरणात आठ दिवसांपूर्वी १७ टक्के जलसाठा होता. आजमितीस तो १३.४१ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. मोर्णा धरणात २0.३७ टक्के जलसाठा होता, तो आज १३.५१ टक्के शिल्लक असून, या धरणाच्या जलसाठय़ात ७ टक्के एवढी घसरण झाली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात ९.९५ टक्के असलेला जलसाठा ३.७६ टक्के आहे. निगरुणा धरणात १७.२९ टक्के जलसाठा होता; आज ११.५७ टक्के आहे. अकोला, बुलडाणा, वान धरणात मात्र ५१.७२ टक्के पाणी होते; आज ते ४७ टक्के आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा धरणात केवळ १४.६७ टक्के जलसाठा होता, तो ११.३0 टक्के आहे. ज्ञानगंगा धरणात ३९.४0 टक्के जलसाठा होता तो ३0.६४ टक्के शिल्लक आहे. मसमध्ये १९.५२ टक्के असलेला जलसाठा आज ११.११ टक्के आहे. पलढग १५.७१ टक्के जलसाठा होता, तो आज ८.२६ टक्के शिल्लक आहे. तर यवतमाळ जिल्हय़ातील पूस धरणाची टक्केवारी जानेवारीअखेरीस जवळपास ३0.९0 टक्के होती ती आजमितीस १0 टक्के आहे. या धरणाची पातळी २0 टक्कय़ाने घसरली आहे. लोअर पूस ६८.७८ टक्के होते, ते ४८.१९ टक्कय़ावर आले आहे. सायखेडा ३६.१५ टक्के होते, ते १९.८६ टक्के आहे. गोकी ४६.५८ टक्के होते, ते २५.२४ टक्कय़ावर आले आहे. वाघाडी ५0.0८ टक्के होते, ते आजमितीस २९.४४ टक्कयावर आले आहे. बोरगाव धरणात जानेवारीअखेरीस ४१.७७ टक्के जलसाठा शिल्लक होता, तो आजमितीस ११.६४ टक्कय़ावर येऊन ठेपला आहे. वाशिम जिल्हय़ातील एकबुर्जी धरणात १.९0 दलघमी तर सोनल धरणात 0.९१ दलघमी साठा शिल्लक आहे.अमरावती जिल्हय़ातील उध्र्ववर्धा, शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन या धरणांची स्थिती याचप्रमाणे आहे.
जलसाठय़ात सर्वत्र घसरण
मागीलवर्षी पावसाने पाठ फिरविल्याने वर्हाडातील सर्वच जलसाठय़ात अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी अकोला जिल्हय़ातील जवळपास धरणात पुरेपूर ५0 टक्केही जलसाठा संचयित झाला नाही, त्यामुळे यावर्षी सिंचनाला पाणी बंद करण्यात आले आहे. तरीही धरणातील पाणी वेगाने घसरत आहे.