शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम: १३ महिन्यात अपघाताचे ११२ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:54 IST

गत १३ महिन्यात जिल्ह्यात घडलेल्या अपघातांच्या २६१ घटनांमध्ये ११० जण ठार; तर २०९ जण जखमी झाले आहेत.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नादुरूस्त वाहने, भरधाव वेग, दिवसेंदिवस वाढती रहदारी, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, विना हेल्मेट वाहन चालविणे, पूर्ण झोप न घेणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे आदींमुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात रस्ते अपघातात माहेवारी दहाजण ठार होतात. हा विषय चिंतेचा बनत असून यामुळे अनेकांचे कुटूंब उध्वस्त होत आहे. गत १३ महिन्यात जिल्ह्यात घडलेल्या अपघातांच्या २६१ घटनांमध्ये ११० जण ठार; तर २०९ जण जखमी झाले आहेत.वाशिम जिल्ह्याच्या चारही सिमेला अकोला, बुलडाणा, हिंगोली आणि अमरावती, यवतमाळ हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमधून दैनंदिन वाशिममार्गे वाहने भरधाव वेगाने धावतात. विशेषत: जडवाहतूक करणाऱ्या वाहनांचा त्यात अधिक प्रमाणात समावेश आहे. अशातच वाशिमसह जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, कारंजा, मानोरा आणि मंगरूळपीर या सहाही शहरांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा लागणाºया हातगाड्या, पार्किंग नसतानाही अस्ताव्यस्त स्वरूपात उभी केली जाणारी वाहनांमुळे वाहतूक वारंवार विस्कळित होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. वाहतूक सुरळित करण्याची जबाबदारी वाहतूक विभागाची आहे; परंतु हा विभाग कारवाईस टाळाटाळ करित असल्याचे दिसून येत आहे.सीटबेल्ट, हेल्मेट सक्तीचे होतेय उल्लंघनरस्त्यांवरील अपघातांमध्ये प्रामुख्याने डोक्याला दुखापत होऊन मृत्यू ओढवण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. ते कमी करण्यासाठी साधारणत: दोन वर्षांपूर्वी चारचाकी वाहनधारकांना सीटबेल्ट बांधणे व दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे केले. त्यानुसार, जिल्ह्यात सुरूवातीच्या काळात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, जिल्हा वाहतूक, शहर वाहतूक विभाग तथा पोलिस प्रशासनाने धडक कारवाईची मोहीम राबवून अनेकांवर दंडात्मक कारवाई केली होती; मात्र गत अनेक महिन्यांपासून ही मोहीम पूर्णत: थंडावली आहे.

दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करायलाच हवा. मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये. स्वत:चा जीव सुरक्षित राहावा, यासाठी किमान वाहतूक नियमांचे पालन प्रत्येकाने करायला हवे.- राजू वाटाणेनिरीक्षक, शहर वाहतूक शाखा, वाशिमवाशिम जिल्ह्यातील अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. प्रश्न जीवाचा असल्याने वाहनधारकांनी देखील वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. रस्ते सुरक्षिततेसंदर्भात पोलीस विभागातर्फे चालकांना मार्गदर्शन केले जाते.- वसंत परदेशीजिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम

 

 

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात