वारकरी सेना राबविणार ‘माझी वारी माझी जबाबदारी’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST2021-06-18T04:14:08+5:302021-06-18T04:14:08+5:30
अकाेला : काेराेनाचे संकट आता कमी झाले असून अनेक जिल्हयांमधील लाॅकडाऊन पूर्णपणे खुले झाले आहे. अशा स्थितीत आषाढी वारीसाठी ...

वारकरी सेना राबविणार ‘माझी वारी माझी जबाबदारी’ अभियान
अकाेला : काेराेनाचे संकट आता कमी झाले असून अनेक जिल्हयांमधील लाॅकडाऊन पूर्णपणे खुले झाले आहे. अशा स्थितीत आषाढी वारीसाठी परवानगी द्यावी या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले असून वारकरीही आक्रमक झाले आहेत. ९ वारकरी संघटनांनी एकत्रित येत ‘माझी वारी माझी जबाबदारी’ हे अभियान हाती घेतले असून या अभियानात १०० वारकरी वारी करतील असा दावा विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे यांनी केला आहे.
विश्व वारकरी सेनेचे हभप अरुण महाराज बुरघाटे, हभप गणेश महाराज शेटे, अखिल वारकरी भाविक मंडळाचे हभप सुधाकर महाराज इंगळे, राष्ट्रीय भागवत धर्म परिषदचे हभप चिंतामणी महाराज परभणीकर, हभप योगेश महाराज सातारकर, पायी दिंडी पालखी सोहळा इतिहास परंपरा संशोधक नांदेडचे हभप सदाशिव महाराज पवळे, वारकरी सेवा फाऊंडेशन हभप पांडुरंग महाराज शितोळे, अखिल विश्व वारकरी परिषद हभप नितीन महाराज सातपुते, वारकरी युवक संघाचे हभप संतोष महाराज काळे, हिंदू रक्षक धर्म परिषदचे हभप दत्ता महाराज गांगरे, हभप महादेव पाटील गायकवाड, हभप योगेश महाराज शिंदे आदींनी वारीसाठी पुढाकार घेतला आहे. या अभियानासाठी वारकऱ्यांनी नियमही तयार केले आहेत.
असे आहेत नियम
वारीमध्ये सहभागी वारकऱ्यांनी काेराेना चाचणी करावी, निगेटिव्ह अहवाल साेबत ठेवावा.
वारीत सहभागी वारकऱ्याचे वय ६० वर्षांच्या आत असावे.
मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्ससह कोरोना संबंधित सर्व नियम पाळावे लागतील.
दिंडी सोहळ्यामध्ये वारकरी संघटनेमधील पदाधिकारी सहभागी हाेतील.
दिंडीसोबत कुठल्याही संतांच्या पादुका राहणार नाहीत. मात्र, अधिष्ठान म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरी व पंचमवेद गाथा राहतील.
प्रत्येक सहभागी वारकऱ्याला ओळखपत्र दिले जाणार आहे.
काेट