प्रभाग क्र १(अ) च्या नगरसेविका शारदा मुकेश आसरे यांचे अचानक निधन झाले. नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला काही महिनेच शिल्लक असताना, या जागेवर पोटनिवडणूक होणार की नाही याबद्दल संभ्रम होता. परंतु सार्वत्रिक निवडणुकीला सहा महिनेपेक्षा जास्त कालावधी शिल्लक असल्यानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. सदर मतदार संघ हा महिलाकरिता राखीव आहे. मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काही महिने लागतील व नंतर किमान दोन महिने आधी सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने निवडून येणाऱ्या नगरसेविकेला पाच ते सहा महिनेच काम करायला मिळणार आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार की मतदान होणार हे दिसून येईल.
तेल्हारा पालिकेच्या प्रभाग क्र १ ची पोटनिवडणूक होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:32 IST