शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

'वॉर्ड बॉय ते 1000 कोटींचा मालक' झालेला तरुण सांगतोय, 'कोण होऊ शकतं बिझनेसमन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 14:50 IST

मिळेल ते काम करा आणि पुढे जात चला प्रतिपादन प्रथितयश उद्योजक राहुल नार्वेकर यांनी प्रेरणादायी व्याख्यान करताना केले.

अकोला: उद्योगधंदा सुरू करायला पैसे नाही तर आयडिया पाहिजे आणि ती आयडिया प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कठोर परिश्रम करण्यासाठी तयार राहा. अपयश ही यशाची नांदी असते. त्यावर मात करून जाण्याची कुवत प्रत्येकात असतेच. मिळेल ते काम करा आणि पुढे जात चला प्रतिपादन प्रथितयश उद्योजक राहुल नार्वेकर यांनी प्रेरणादायी व्याख्यान करताना केले.श्री शिवाजी महाविद्यालय व संत गाडगेबाबा प्रबोधन परिषदेमार्फत आयोजित महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेला विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादात सोमवारी दिमाखदार सुरुवात झाली. राहुल नार्वेकर यांचा जीवनप्रवास एक वॉर्ड बॉय ते १ हजार कोटीचे मालक असा आहे. ते म्हणाले की, एकदा अपयश आले की आपण त्या कामाकडे, व्यवसायाकडे दुर्लक्ष करतो आणि आयुष्यभर एका अपयशाची मनाशी गाठ बांधून पुन्हा कोणतेही काम करण्याची हिंमत करत नाही; मात्र प्रत्येक विद्यार्थ्याने, उद्योजक व व्यापाऱ्याने एका अपयशाने खचून न जाता पुन्हा त्याच जोमाने कामाला लागण्याची गरज आहे. जीवनात संघर्ष अटळ असून, त्याला घाबरू नका आणि अपयशाच्या भीतीने सुरुवातीलाच खचून जाऊ नका, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. आत्महत्येचा विचारही करू नका. आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, असे त्यांनी युवकांना आश्वासित केले. या पुढे युवक व महिलांनी चांगले प्रोजेक्ट आणल्यास त्यांना स्टार्टअपसाठी पूर्ण सहकार्य करू, असेही यावेळी नार्वेकर म्हणाले. विद्यार्थ्यांनी या वेळी त्यांना अनेक प्रश्न विचारले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. आर. इंगळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा प्रबोधन परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. अनिल राऊत आणि डॉ. आशीष राऊत हे विचार मंचावर उपस्थित होते. राहुल नार्वेकर आणि सोनिया खुराणा यांचे स्वागत महाविद्यालयामार्फत करण्यात आले तर आभार प्रदर्शन आणि संचालन प्रा. संगीता शेगोकार यांनी केले. या प्रसंगी नवउद्योजक आशीष चौखडे व काही निवडक विद्यार्थ्यांचादेखील यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसाय