शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अमृत योजनेकरिता वान धरणाचे पाणी पूर्णपणे आरक्षित करू नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:35 IST

अकोला : वान धरणाचे पाणी अकोला अमृत योजनेंतर्गत  अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात येणार आहे. वान धरणाचे  पाणी शेतीकरिता आरक्षित आहे. शहरातील नागरिकांचा जर  िपण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे, आवश्यक तेवढे  पाणी घेण्यास हरकत नाही.

ठळक मुद्देशेतकरी संघटना : वान धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या  शेतकर्‍यांचे मांडले प्रश्न!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वान धरणाचे पाणी अकोला अमृत योजनेंतर्गत  अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात येणार आहे. वान धरणाचे  पाणी शेतीकरिता आरक्षित आहे. शहरातील नागरिकांचा जर  िपण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे, आवश्यक तेवढे  पाणी घेण्यास हरकत नाही. मात्र, या धरणातील पाणी पूर्णपणे  िपण्याच्या पाण्याकरिता आरक्षित करू  नये, अशी मागणी शेतकरी  संघटनेचे नेते ललित बहाळे यांनी केली.सोमवारी जिल्हा परिषद विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार  परिषदेत ललित बहाळे यांनी वान धरणाच्या पाण्यावर अवलंबून  शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे प्रश्न मांडले. वान धरणालगत वास् तविक पाहता अकोला जिल्हय़ातील तेल्हारा व बुलडाणा  जिल्हय़ातील संग्रामपूर हे दोन तालुके आदिवासी क्षेत्रात व  डोंगराळ भागाला लागून आहेत. अकोला शहरापासून फारच  लांब आहेत. येथे कोणत्याही प्रकारचे कारखाने व व्यापार नाही.  येथील सर्व शेतकरी हे शेतीवर अवलंबून आहेत. वान धरणा  व्यतिरिक्त येथे कोणतीही सिंचनाकरिता पाण्याची व्यवस्था नाही.  धरण उभारण्याकरिता सर्व लाभधारकांनी जमिनी दिल्या आहेत.  तसेच याआधी वान प्रकल्पाचे ४७ टक्के पाणी शासनाने  िपण्यासाठी तेल्हारा, अकोट ८४ खेडी, जळगाव जामोद, शेगाव  १५९ खेडी करिता आरक्षित केलेले आहे. त्यामुळे आता फक्त  ५३ टक्के पाणी सिंचनासाठी शिल्लक असल्याचे बहाळे यांनी सांगि तले. धरणात साचलेला गाळ बाष्पीभवन व गळतीमुळे होणारे  कमी पाणी याचा विचार करता फक्त प्रत्यक्षात २५ ते ३0 टक्के  पाणीच सिंचनाकरिता मिळणार आहे. येथील नागरिकांचे जीवन  शेतीवरच अवलंबून आहे. या योजनेमुळे शेतकरी सिंचन करू   शकणार नाहीत. त्यात शेतकरी कर्जबाजारी आहेत. लाभधारक  शेतकर्‍यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. शे तकरी वर्गावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, याकरिता  अकोला अमृत योजनेंतर्गत अकोला शहरासाठी पाण्याचा वान  धरण व्यतिरिक्त दुसरा मार्ग शोधावा, असेही बहाळे यांनी सांगि तले.शासनाच्या प्रचलित नियमानुसार फक्त धरणातून १५ टक्के पाणीच  पिण्यासाठी आरक्षित करावे व उर्वरित सिंचनासाठी ठेवावे, असा  शासनाचा नियम असताना वान धरणाचे १00 टक्के पाणी कसे  काय आरक्षित करीत आहेत, असा सवाल याप्रसंगी उपस्थित शे तकर्‍यांनी केला. यासंदर्भात गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.  रणजित पाटील यांच्याकडे निवेदन सोपविले असल्याचेही बहाळे  यांनी सांगितले. 

टॅग्स :WaterपाणीDamधरण