११ जानेवारीला अकोल्यात वॉकथॉन
By Admin | Updated: October 18, 2014 00:48 IST2014-10-18T00:48:14+5:302014-10-18T00:48:14+5:30
धावपटू मिल्खासिंग यांची उपस्थिती.

११ जानेवारीला अकोल्यात वॉकथॉन
अकोला : मागील काही वर्षांपासून अकोलेकरांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेल्या वॉकथॉन या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे या वर्षी देखील आयोजन आयएमएच्या वतीने करण्यात आले आहे. ११ जानेवारी २0१५ रोजी हा कार्यक्रम होणार असून, यावर्षी आंतरराष्ट्रीय धावपटू मिल्खासिंग यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती वॉकथॉनचे मानद सचिव डॉ. राजेंद्र सोनोने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. आयएमऐच्यावतीने राबविण्यात येणार्या सामाजिक उपक्रमांचा एक भाग म्हणून अकोल्यातील नागरिकांमध्ये निरोगी आरोग्यासाठी चालण्याचे, धावण्याचे महत्त्व बिंबविण्यासाठी मागील काही वर्षांपासून वॉकथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा आंतरराष्ट्रीय धावपटू मिल्खासिंग यांची उपस्थिती राहणार आहेत. या स्पर्धात्मक कार्यक्रमात मिल्खासिंग हेदेखील अकोल्याच्या रस्त्यावर धावणार आहेत, असे डॉ. सोनोने यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आयएमएचे अध्यक्ष डॉ. विजय खेरडे, तसेच डॉ. प्रशांत मुळावकर, डॉ. गिरीधर पनपालिया, डॉ. जयदीप महाजनी, डॉ. अविनाश पाटील, डॉ. विनीत हिंगणकर, डॉ. सत्येन मंत्री, डॉ. नितीन बोराखडे, डॉ. संदीप चांडक, डॉ. सदानंद भुसारी, डॉ. पराग टापरे, डॉ. रवींद्र सिंघी, डॉ. जुगल चिराणिया, डॉ. दीपक भट, डॉ. अजय चव्हाण तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील उपस्थित होते.