वन्य प्राण्यांचा धुडगूस, पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांचे जागते रहो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST2021-07-16T04:14:32+5:302021-07-16T04:14:32+5:30

वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतामध्ये खडा पहारा द्यावा लागत आहे. रात्रीच्या ...

Wake up wild animals, keep farmers awake for crop protection! | वन्य प्राण्यांचा धुडगूस, पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांचे जागते रहो!

वन्य प्राण्यांचा धुडगूस, पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांचे जागते रहो!

वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतामध्ये खडा पहारा द्यावा लागत आहे. रात्रीच्या वेळेस रानडुकरे शेतामध्ये शिरून पिकांचे नुकसान करीत आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांवर हल्लेसुद्धा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. वन्य प्राण्यांच्या वावरामुळे चालू वर्षाच्या हंगामातील पीक उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. या प्रकरणी वनविभागाने शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. नैसर्गिक शेतीवर ७० टक्के शेतकरी बांधवांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. आता वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी हतबल झाला आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वन्य प्राणी रोही व डुकरांच्या प्रजननासाठी आवश्यक ती इंजेक्शने पुरवली जातात व त्यांचे प्रजनन रोखले जाते किंवा त्यांना मारण्याची परवानगी दिली जाते. शासनाने शेतकऱ्यांना परवानगी द्यावी.

-ज्ञानेश्वर ताथोड, शेतकरी कसुरा

फोटो:

शेतकऱ्यांना आवाहन, तक्रार करा!

प्रत्येक गावातून दोन तक्रारी तरी दर आठवड्याला जिल्हाधिकारी यांना पाठविण्याचे आवाहन ज्ञानेश्वर ताथोड यांनी शेतकऱ्यांना केले आहे. त्याचबरोबर जेणेकरून यावर उपाययोजना केली जाईल व संकटातून शेतकरी वाचतील. यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी कराव्यात.

Web Title: Wake up wild animals, keep farmers awake for crop protection!