शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

सुपर स्पेशालिटीची प्रतीक्षा कायम; अंतर्गत बदलांसाठी भिंतींची तोडफोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 12:30 IST

अकोला: सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे ८५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, वैद्यकीय उपकरणे येण्यासही सुरुवात झाली आहे; मात्र या उपकरणांसाठी इमारतीमध्ये अंतर्गत बदलासाठी आतील काही भिंती तोडण्यात येत आहेत.

अकोला: सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे ८५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, वैद्यकीय उपकरणे येण्यासही सुरुवात झाली आहे; मात्र या उपकरणांसाठी इमारतीमध्ये अंतर्गत बदलासाठी आतील काही भिंती तोडण्यात येत आहेत. त्यामुळे इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येण्यास आणखी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.अकोल्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी १ जानेवारी २०१४ रोजी १५० कोटींचा निधी मंजूर झाला. त्यातील निम्म्या खर्चाची तरतूद इमारतीच्या बांधकामासाठी करण्यात आली. त्यानुसार मागील तीन वर्षांपासून इमारतीचे बांधकाम सुरू आहे. नियोजनानुसार आॅक्टोबर २०१८ मध्ये इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येणे अपेक्षित होते; परंतु या कालावधीत इमारतीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने दोन वेळा मुदत वाढ देण्यात आली. याच दरम्यान वैद्यकीय उपकरणे येण्यास सुरुवात झाली; पण यातील काही उपकरणांचा आकार मोठा असल्याने इमारतीमध्ये अंतर्गत बदल करण्यात येत आहेत. यामध्ये काही खोल्यांच्या भिंती पाडाव्या लागत आहे. अंतर्गत बदलांसह इतर काही तांत्रिक बाबींमुळे इमारत बांधकाम पूर्णत्वास येण्यासाठी आणखी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

नेमकी अडचण काय?सुपर स्पेशालिटीला मान्यता मिळताच केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई कार्यालर्यालयामार्फत नकाशा तयार करण्यात आला; परंतु त्यावेळी वैद्यकीय उपकरणे खरेदीसंदर्भात कुठलेच निर्णय न झाल्याने त्यांचे योग्य माप प्राप्त झाले नव्हते. अशा परिस्थितीत तयार करण्यात आलेल्या नकाशानुसार इमारतीचे बांधकाम करण्यात आले. इमारतीचे बांधकाम ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यानंतर वैद्यकीय उपकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे हे अंतर्गत बदल करण्यात येत असल्याने सुपर स्पेशालिटीची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.इमारतीच्या बांधकामाची जबाबदार सीपीडब्ल्यूडी विभागाची असली, तरी अंतर्गत दुरुस्तीची जबाबदारी आरोग्य विभागाच्या एचएलएल खात्याकडे आहे. त्यामुळे वैद्यकीय उपकरणे बसविताना इमारतीमध्ये अंतर्गत बदल करायचे असल्यास त्याचा खर्च एचएलएल विभागालाच करावा लागतो. या खर्चाची तरतूद करारामध्येच केलेली असल्याने अतिरिक्त खर्च होत नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.- धनंजय चिवंडे, सहायक अभियंता, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागइमारतीचे ८५ टक्के बांधकाम पूर्ण झाले. मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, बांधकाम पूर्णत्वास आल्यावरच सुपर स्पेशालिटीच्या उद््घाटनाचा मुहूर्त निघणार आहे.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

 

टॅग्स :Akolaअकोलाhospitalहॉस्पिटल