शेतकर्‍यांच्या बँक खाते क्रमाकांची महसूल विभागाला प्रतीक्षा

By Admin | Updated: July 17, 2014 01:44 IST2014-07-17T01:41:14+5:302014-07-17T01:44:09+5:30

अकोला जिल्ह्यातील गारपीटग्रस्त ४ हजारांवर शेतकर्‍यांच्या मदतीचे वाटप प्रलंबित.

Waiting for the revenue department of farmers' bank accounts | शेतकर्‍यांच्या बँक खाते क्रमाकांची महसूल विभागाला प्रतीक्षा

शेतकर्‍यांच्या बँक खाते क्रमाकांची महसूल विभागाला प्रतीक्षा

अकोला : बँक खाते क्रमांक प्राप्त झाले नसल्याने, जिल्ह्यातील गारपीटग्रस्त ४ हजार ७५ शेतकर्‍यांना अद्यापही मदतीचे वाटप करण्यात आले नाही. मदतीचा निधी उपलब्ध असला तरी, मदतीचे वाटप प्रलंबित असल्याने संबंधित गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खाते क्रमांकाची प्रतीक्षा महसूल विभागामार्फत केली जात आहे.
गेल्या २२ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान झालेल्या वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील गहू, हरभरा, संत्रा, लिंबू, केळी व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ५0 टक्क्याच्यावर पीक नुकसान भरपाईसाठी शासनामार्फत गारपीटग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. या पॅकेजांतर्गत जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ५७ कोटींचा मदतनिधी गेल्या मार्चमध्ये शासनाकडून प्राप्त झाला. उपलब्ध मदत निधीतून जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमार्फत गेल्या मे अखेरपर्यंत मदतीची रक्कम गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. त्यामध्ये ४९ कोटी २६ लाख ३३ हजार १३४ रुपयांची मदत संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली; मात्र ज्या शेतकर्‍यांनी महसूल विभागाकडे बँक खाते क्रमांक सादर केले नाही, अशा जिल्ह्यातील ४ हजार ७५ शेतकर्‍यांची मदतीची रक्कम, त्यांच्या बँक खात्यात अद्यापही जमा करण्यात आली नाही.
मदतीचा निधी प्राप्त होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला तरी, बँक खाते क्रमांकाअभावी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त ४ हजारांवर शेतकर्‍यांना ७ कोटी ७३ लाख ६६ हजार ८६६ रुपयांच्या मदत वाटपाचे काम अद्यापही प्रलंबित आहे.
ही मदत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी संबंधित गारपीटग्रस्त शेतकर्‍यांकडून त्यांचा बँक खाते क्रमांक केव्हा प्राप्त होतो, या बाबतची प्रतीक्षा महसूल विभागाकडून केली जात
आहे.

असे आहेत शेतकरी!
तालुका          शेतकरी
अकोला          ४१७
बाश्रीटाकळी    १0५0
तेल्हारा             १७
बाळापूर           ३९७
पातूर             १७६१
मूर्तिजापूर        ४३३

एकूण             ४0७५

Web Title: Waiting for the revenue department of farmers' bank accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.