१५ कोटींच्या रस्त्यांना ‘मार्किंग’ची प्रतीक्षा
By Admin | Updated: November 24, 2014 01:38 IST2014-11-24T01:38:29+5:302014-11-24T01:38:29+5:30
अकोला मनपाचा फंडा; काम रखडले.

१५ कोटींच्या रस्त्यांना ‘मार्किंग’ची प्रतीक्षा
अकोला: रस्ते दुरुस्तीसाठी प्राप्त १५ कोटींच्या अनुदानातून शहरा तील १८ रस्त्यांची कामे मार्गी लागल्याचा गवगवा करणार्या मनपा प्रशासनाने आता कामाला सुरुवात होण्यापूर्वी रस्त्यांची ह्यमार्किंगह्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता मुंबईतील एजन्सीकडे विचारणा करण्यात आली असून, जोपर्यंत ह्यमार्किंगह्णच्या कामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत रस्ते दुरुस्तीला सुरुवात होणार नसल्याचे निश्चित झाले आहे.
तत्कालीन आयुक्त दीपक चौधरी यांच्या प्रयत्नांमुळे दुरवस्था झालेल्या रस्ते दुरुस्तीसाठी शासनाने १५ कोटींचे अनुदान मंजूर केले. २0१३ मध्ये प्राप्त झालेल्या अनुदानातून मुख्य १८ रस्त्यांची दुरुस्ती होणार असून, यामध्ये डांबरीकरणाचे १२ तर उर्वरित सहा सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे निर्माण होईल. मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी ई-निविदा प्रक्रिया एकदा नव्हे तर तब्बल सात वेळा प्रकाशित केली. निविदा प्रक्रियेत प्रशासनाने नमूद केलेल्या क्लिष्ट शर्ती व अटींमुळे डांबरी रस्त्यांचा विषय निकाली निघाला असून, सिमेंट रस्त्यांकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपण्यापूर्वीच प्रशासनाने शहरातील १८ रस्त्यांची कामे लवकरच सुरू होण्याचा गवगवा केला. तोपर्यंत सिमेंट रस्त्यांची निविदा अधांतरीच होती. प्रशासनाची भूमिका लक्षात घेता, सत्ताधारी भाजप, शिवसेनेच्या पदाधिकार्यांनीदेखील घाईघाईत सिव्हिल लाईन चौकात रस्ता उद्घाटनाची औपचारिकता पार पाडली; परंतु झाले नेमके उलटेच. आजपर्यंत सहापैकी चार सिमेंट रस्त्यांसाठी निविदाच सादर न झाल्याने सिमेंट रस्त्यांचे काम होईल की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हा प्रकार कमी म्हणून की काय, डांबरी रस्त्यांचे कार्यादेश घेणार्या कंत्राटदारांना तूर्तास काम न करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. डांबरी रस् त्यांसह सिमेंट रस्त्यांचे आधी मोजमाप होईल, याकरिता मुंबईस्थित एजन्सीमार्फत संपूर्ण १८ रस्त्यांची ह्यमार्किंगह्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एकूणच, १८ रस्त्यांच्या मुद्यावर प्रशासनाच्या कोलांटउड्या लक्षात घेता, अकोलेकरांच्या संयमाची परीक्षा घेतल्या जात असल्याचे चित्र आहे.