कर्जमाफीच्या निकषांची प्रतीक्षा!
By Admin | Updated: June 13, 2017 00:41 IST2017-06-13T00:41:57+5:302017-06-13T00:41:57+5:30
पाच एकरापेक्षा जास्त जमीन : ७३ हजार शेतकरी सरसकट कर्जमाफीसाठी ठरू शकतात पात्र

कर्जमाफीच्या निकषांची प्रतीक्षा!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह निकषांच्या आधारे सरसकट कर्जमाफीला शासनामार्फत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सरकाकडून दिली जाणारी सरसकट कर्जमाफी कोणकोणत्या निकषांच्या आधारे दिली जाणार, याबाबत पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या जिल्ह्यातील ७३ हजार ४०० शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील पाच एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या २ लाख ४३ हजार ९५० अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्यासोबतच निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यास शासनामार्फत ११ जून रोजी तत्त्वत: मान्यता देण्यात आली. सरसकट कर्जमाफीमध्ये जिल्ह्यातील पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेले ७३ हजार ४०० शेतकरी पात्र ठरू शकतात; मात्र सरकारकडून दिली जाणारी सरसकट कर्जमाफी निकषांच्या आधारे देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणकोणत्या निकषांच्या आधारे कर्जमाफी देण्यात येणार आणि निकषांच्या आधारे किती शेतकरी सरसकट कर्जमाफीसाठी पात्र ठरणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
निकषांसह कर्जमाफीच्या आदेशाकडे लक्ष!
सरसकट कर्जमाफी निकषांच्या आधारे देण्यात येणार आहे, त्यामुळे कोणकोणत्या निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार, याबाबत निकष सरकारकडून केव्हा जाहीर करण्यात येणार आणि निकषांच्या आधारे दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयालयासह संबंधित यंत्रणांना केव्हा प्राप्त होणार, याकडेही आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कर्जमाफीसाठी पात्र अल्पभूधारक शेतकरी!
अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील पाच एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या २ लाख ४३ हजार ९५० अल्पभूधारक शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामध्ये अकोला-५६९४०, बाळापूर -२९३७१, पातूर -२५९५९, मूर्तिजापूर -३४०१३, बार्शीटाकळी -२८८३३, आकोट-३९३४० व तेल्हारा तालुक्यातील २९४९४ अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे.