कोट्यवधीच्या जागेला निर्णयाची प्रतीक्षा!

By Admin | Updated: December 20, 2014 00:44 IST2014-12-20T00:44:17+5:302014-12-20T00:44:17+5:30

चार जीनच्या जागेचा तिढा सोडविण्यात प्रशासन अपयशी.

Waiting for billions of seats! | कोट्यवधीच्या जागेला निर्णयाची प्रतीक्षा!

कोट्यवधीच्या जागेला निर्णयाची प्रतीक्षा!

अकोला : महापालिकेच्या मालकीच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या चार जीनच्या जागेचा न्यायालयीन तिढा सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. एकीकडे राज्य सरकार अकोला शहरासाठी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी जागेच्या शोधात असताना, प्लाटॅ नं. ७ व शिट क्रमांक ३९ (बी) वरील ही ८२ हजार चौरस फूट जागा न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याची बाब समोर आली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी अकोला शहरासाठी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह उड्डाणपूल, भूमिगत गटार योजना आदी महत्त्वाचे विषय मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. शहराचे भौगोलिक क्षेत्रफळ लक्षात घेता, महापालिकेच्या मालकीच्या जागांवर व्यावसायिक संकुल उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी मनपाच्या अशा अनेक जागा आहेत. या जागांवर व्यावसायिक संकुल उभारल्यास प्रशासनाला मोठय़ा प्रमाणात आर्थिक उत्पन्न प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये मनपाची मालकी असलेल्या सर्वांत मोठे क्षेत्रफळ असलेल्या चार जीनची जागा न्यायालयीन कचाट्यात आहेत. प्लॉट नं.७, शिट क्रमांक ३९ (बी) वर तब्बल ८२ हजार चौरस फूट जागेसंदर्भात विनोद तोष्णीवाल यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. यासंदर्भात आजवर उच्च न्यायालयात चार वेळा, तर जिल्हा न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी पार पडली. याप्रकरणी मनपा प्रशासनाची बाजू भक्कम आहे. नागपूर खंडपीठात सदर प्रकरणी तात्काळ सुनावणी होण्याची गरज आहे. या जागेवर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल असो वा व्यावसायिक संकुल उभारल्यास मनपाला कोट्यवधींचे उत्पन्न कायमस्वरूपी मिळणार आहे. याप्रकरणी मनपा प्रशासन न्यायालयीन पाठपुरावा करताना कमकुवत ठरत असल्याने जागेचा तिढा कायम आहे.

Web Title: Waiting for billions of seats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.