वाडेगावच्या जवानाचा आसाममध्ये आजाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2017 01:02 IST2017-07-06T01:02:58+5:302017-07-06T01:02:58+5:30
वाडेगाव : येथील सीआयएसएफमध्ये कार्यरत जवान रामेश्वर महादेव घाटोळ (२९) यांचा आसाममध्ये कर्तव्यावर असताना आजाराने मृत्यू झाला.

वाडेगावच्या जवानाचा आसाममध्ये आजाराने मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडेगाव : येथील सीआयएसएफमध्ये कार्यरत जवान रामेश्वर महादेव घाटोळ (२९) यांचा आसाममध्ये कर्तव्यावर असताना आजाराने मृत्यू झाला.
रामेश्वर घाटोळ हे २००९ मध्ये सीआयएसएफमध्ये भरती झाले होते. हे जोरहाटमध्ये जंगलात ओएनजीमध्ये कार्यरत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने ४ जुलै रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव आसाममधून नागपूर येथे विमानतळावर आणण्यात आले. वाडेगाव येथे बाळापूरवेसमध्ये ५ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी सीआयएसएफचे जवान अशोक ठाकरे, एस. पी. महल्ले, एस.के. यादव आदींनी त्यांना सलामी दिली. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, भाऊ, बहीण व आप्त परिवार आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी गावातील मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.