व-हाडाला सव्वा तीन लाख मेट्रिक टन खते लागणार!
By Admin | Updated: September 20, 2014 19:57 IST2014-09-20T19:57:36+5:302014-09-20T19:57:36+5:30
रब्बी हंगामातील नियोजन: युरिया, डीएपीवर सर्वाधिक भर.

व-हाडाला सव्वा तीन लाख मेट्रिक टन खते लागणार!
अकोला: पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांना गरजेएवढ्या रासायनिक खतांचा पुरवठा होत नसल्याने, या भागातील शेतकर्यांना दरवर्षी खत टंचाईचा सामना करावा लागतो आणि गरज भागविण्यासाठी काळाबाजारातून खते खरेदी करावी लागतात, ही वस्तुस्थिती विचारात घेऊन, यावर्षी कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी लागणार्या ३ लाख २५ हजार ४५३ मेट्रिक टन खताचे नियोजन केले आहे.
यावर्षी खरीप हंगामात पश्चिम विदर्भात ३0 हजार मेट्रिक टन युरिया खत कमी पडले होते. परिणामी गरज भागविण्यासाठी शेतकर्यांना जादा रक्कम मोजून खते घ्यावी लागत आहेत. या पार्श्वभूमीवर, रब्बी हंगामात खताची टंचाई जाणवू नये, यासाठी कृषी विभागाने खतांचे नियोजन केले आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी युरिया व डीएपीची गरज बघता, यावर्षी ९८ हजार ६0९ मेट्रिक टन युरिया व ६0,९९६ मेट्रिक टन डीएपीची मागणी करण्यात आली आहे.
यंदाच्या रब्बी हंगामाकरिता पश्चिम विदर्भासाठी सव्वातीन लाख मेट्रिक टन खताची मागणी नोंदविली आहे. शेतकर्यांना खतांबाबत कोणतीही अडचण येऊ नये या दृष्टीने हे नियोजन केले असल्याचे अमरावतीचे विभागीय कृषी सह संचालक एस. आर. सरदार यांनी सांगीतले.
** जिल्हानिहाय खताचे नियोजन
अकोला जिल्ह्यासाठी विविध प्रकारची एकूण ७0,९00 मेट्रिक टन खते लागणार असून, अमरावती जिल्ह्याला ९४,९३0, बुलडाणा जिल्ह्याला ४९,८९६, वाशिम जिल्ह्याला ४५,000 तर यवतमाळ जिल्ह्यासाठी ६४,७२७ मेट्रिक टन खतांचे नियोजन करण्यात आले आहे.
** जिल्हानिहाय अशी लागतील खते
युरिया डीएपी मोप एसएसपी एएस सीएएन एमएपी
अकोला- २0,000 १४,000 ३000 १७,000 २00 १00 २000
अमरावती- २९,९00 २१,६५0 ७४७५ १५,७00 १७८0 १३५ 00
बुलडाणा- १२,९२0 ८0२0 २६७२ ५0४८ १0४0 00 00
वशिम - १0,000 ८,000 १000 ७000 ५00 00 00
यवतमाळ - २५,७८९ ९0२६ ४९७0 ५0६६ ३0८ 00 00
मिश्र खते
१0:२६:२६ १२:३२:१६ १४:३५:१४ १५:१५:१५ १६:१६:१६ २0:२0:२0 २४:२४:00
अकोला ३८00 १00 ३00 ३000 १६00 ३६00 २२00
अमरावती २0६0 १८२0 १६५0 २0७0 १८२0 ७१00 १७७0
बुलडाणा ४0१0 ४0१0 00 00 ५0५0 ५0४९ २0७७
वाशिम २000 ५00 १000 १000 १0,000 ४000 00
यवतमाळ ६८२३ १५३५ १७३८ ३0५६ २४७९ ३५७६ ३६१