३६२ माध्यमिक शाळांमध्ये मतदार जागृती मंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 15:05 IST2019-04-03T15:04:58+5:302019-04-03T15:05:12+5:30
अकोला: जिल्ह्यात मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी, या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शाळांमध्ये मतदार जागृती मंच स्थापन करण्याचा आदेश होता.

३६२ माध्यमिक शाळांमध्ये मतदार जागृती मंच
अकोला: जिल्ह्यात मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी, या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शाळांमध्ये मतदार जागृती मंच स्थापन करण्याचा आदेश होता. त्यानुसार शिक्षण विभागाने मंगळवारी बैठकीत आढावा घेतला असता, जिल्ह्यातील ३६२ माध्यमिक शाळांमध्ये मतदार जागृती मंच स्थापन झाले असून, या मंचामार्फत मतदार जागृती करण्यात येत आहे.
निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी राहते. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांचे आई-बाबा, आजी-आजोबांना पत्र लिहिण्यासोबतच शाळांमध्ये मतदार जागृती मंच उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांनी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये मतदार जागृती मंच स्थापन करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ३६२ शाळांमध्ये मतदार जागृती मंच स्थापन झाले असून, या मंचामार्फत जागृतीचे काम करण्यात येत आहे. मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक या मंचामध्ये सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)