एका ‘टच’वर मतदारांची माहिती

By Admin | Updated: October 6, 2014 01:36 IST2014-10-06T01:36:39+5:302014-10-06T01:36:39+5:30

मतदार यादी तळहातावर मावणार्‍या स्मार्ट फोनवर पाहणे आता शक्य.

Voter information on a 'touch' | एका ‘टच’वर मतदारांची माहिती

एका ‘टच’वर मतदारांची माहिती

राम देशपांडे / अकोला
सध्या सर्वच स्तरातून इंटरनेटचा वापर वाढलेला असून, टेक्नो सॅव्ही जगताकडे वाटचाल करणार्‍या शहरातील काही पक्ष उमेदवारांनी नोंदणी झालेल्या जुन्या-नव्या मतदारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची नावे कुठल्या मतदारसंघात आहेत, याची माहिती त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी मोबाईल अँप्सचा वापर सुरू केला आहे.
काही इंफोटेक कंपन्यांनी तयार केलेल्या अँप्सद्वारे निवडणूक प्रशासनाने तयार केलेली मतदार यादी तळहातावर मावणार्‍या स्मार्ट फोनवर पाहणे आता शक्य झाले आहे. शहरातील काही पक्ष उमेदवारांनी या मोबाईल अँप्सचा वापर सुरू केला आहे. इंटरनेटच्या सहाय्याने क्षणार्धात संपूर्ण राज्यातील विधानसभा मतदारांची यादी दिसत असल्यामुळे, उमेदवारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांंच्या मोबाईलवरही ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कमीत कमी वेळेत व अचूक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी या अँप्सचा उपयोग होत असल्याने, मतदारांना आकर्षित करण्यासाठीदेखील त्याचा उपयोग उमेदवारांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या मोबाईल अँप्सद्वारे नावानुसार, अडनावानुसार, घर क्रमांकानुसार, वयानुसार, कुटुंबानुसार, पत्त्यानुसार, भागानुसार, मतदान केंद्रानुसार, कार्यकर्त्यांंनुसार, जाती नुसार, संदर्भ व्यक्तीनुसार, बदललेल्या पत्त्यानुसार, व्यवसायानुसार, रक्तगटानुसार, जन्मतारखेनुसार व मृत म तदार अशा विविध प्रकारे माहिती उपलब्ध होऊ शकते. मोबाईल अँप्स वापरणार्‍या अधिकृत व्यक्तीलाच त्याचा पासवर्ड मिळत असल्याने त्यांची विश्‍वासार्हता अधिक बळावते.

Web Title: Voter information on a 'touch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.