मतदार ओळखपत्र घरपोहोच वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST2021-07-11T04:14:49+5:302021-07-11T04:14:49+5:30
---------------------------- तेल्हारा तालुक्यात ९.८ मि.मी. पावसाची नोंद तेल्हारा : जिल्ह्यात शुक्रवारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. दरम्यान, जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात ...

मतदार ओळखपत्र घरपोहोच वितरित
----------------------------
तेल्हारा तालुक्यात ९.८ मि.मी. पावसाची नोंद
तेल्हारा : जिल्ह्यात शुक्रवारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. दरम्यान, जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यात शुक्रवारी ९.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे रखडलेल्या पेरण्या सुरू झाल्या असून, खरीप पिकांना संजिवनी मिळाली आहे.
--------------------------
कोविड लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद
जामठी बु.: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोविड-१९च्या लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कवठा सोपीनाथ येथे १६५ तसेच उमरी अरब उपकेंद्रांतर्गत बीडगाव येथे १६५ नागरिकांनी लस घेतली. लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कराळे यांचे मार्गदर्शनाखाली डाॅ. शेगोकार, डाॅ. शिवम हरणे, डाॅ. मुजफ्फर सैय्यद, मंगेश सरोदे, मुळे, घुगे, वंदना खडसे, थोरात, संगीता सोनकुसरे, आरोग्य सहाय्यक खेडकर, जया भेले, चव्हाण, गवई, काकड, धाये यांनी परिश्रम घेतले.