व्याळा येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना
By Admin | Updated: April 25, 2015 02:16 IST2015-04-25T02:16:09+5:302015-04-25T02:16:09+5:30
अकोला जिल्ह्यातील घटना; पोलीस बंदोबस्त तैनात.

व्याळा येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना
व्याळा (जि. अकोला): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी व्याळा येथे उजेडात झाला. त्यामुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. व्याळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या पुतळ्याची विटंबना झाल्याचे सकाळी उजेडात आले. ही वार्ता परिसरात वार्यासारखी पसरली. ग्रामस्थही घटनास्थळी जमा झाले. याबाबत पोलीस प्रशासनालाही कळविण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकुमार काळे, बाळापूरचे ठाणेदार घनश्याम पाटील, भारिप-बमसं युवक आघाडीचे नेते राजेंद्र पातोडे, पंचायत समितीचे सभापती निरंजन शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे, गुलाबराव उमाळे यांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांची चर्चा केली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी पुतळ्याचे पूजन व हारार्पण केले. दोषींवर दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधिकार्यांनी दिले. दरम्यान या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी भा.दं.वि.च्या २९५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत. गावात शांतता आहे.