वीट्टभट्टय़ा, हॉटेलमध्ये राबताहेत बालमजूर

By Admin | Updated: October 14, 2014 01:30 IST2014-10-14T01:30:44+5:302014-10-14T01:30:44+5:30

अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बालमजुरी कायद्याचे उल्लंघन.

Vitabhbhataya, Balamjur in the hotel | वीट्टभट्टय़ा, हॉटेलमध्ये राबताहेत बालमजूर

वीट्टभट्टय़ा, हॉटेलमध्ये राबताहेत बालमजूर

शिवर : लहान मुलांच्या शिक्षणासाठी एकीकडे शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत असले तरी ग्रामीण भागात सर्रास बालमजुरी सुरू असल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. विविध हॉटेल्स, बांधकाम व वीटभट्टय़ांवर दिवसरात्र बालमजूर काम करीत आहेत. लहान मुले धोकादायक कामावर आई-वडिलांसह काम करताना दिसतात. बालमजुरी नियमांचे उल्लंघन होत असून, संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे बालमजूर कायदा हा केवळ कागदावरच असल्याचे दिसून येते. १४ वर्षांंपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुकानात अथवा इतर ठिकाणी कामाला ठेवणे, त्यांच्याकडून कामे करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे; परंतु बालकामगारांकडून लहान-मोठी कामे करून घेतल्याचे दिसून येते. लहान मुले काम करताना दिसत असतानासुद्धा कोणतीही कारवाई केली जात नाही. शहरांमधील हॉटेल्स, चहा टपर्‍या, कापड दुकान, किराणा दुकान, रसवंती, पाणीपुरी स्टॉल, थंडपेयाची दुकाने इतकेच नव्हे तर वीटभट्टय़ा व इतर जोखमीच्या ठिकाणी बालमजूर राबताना आढळतात. गारा तुडविणे, ओल्या विटा डोक्यावर वाहून नेणे आदी मेहनतीची कामे बालमजुरांकडून करून घेतले जातात; परंतु याबाबत कधीही धाडसत्र राबवून प्रशासनाकडून संबंधितांवर कठोर कारवाई केली जात नाही. बालवयात मुलांच्या मनावर विविध धोकादायक कामांमुळे विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. जी कामे मुलांना पेलणार नाही, अशी कामेसुद्धा त्यांच्याकडून करवून घेतली जातात. मुलांना कामावर राबविणे गुन्हा असल्याचे माहीत असतानासुद्धा काही व्यापारी वर्ग पैसे वाचविण्याच्या नादात लहान मुलांना कामावर ठेवतात. जिल्हय़ात बाळापूर, चोहोट्टा बाजार, हाता, मनात्री, निमकर्दा, अंदुरा, मुंडगाव व पातूर परिसरात अनेक वीटभट्टय़ा आहेत. या ठिकाणी बालमजूर काम करीत आहेत.

Web Title: Vitabhbhataya, Balamjur in the hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.